Ticker

6/recent/ticker-posts

मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनीने जिंकले दोन सुवर्ण पदके


दुहेरी सुवर्ण यश

भंंडारा:-मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कूलच्या इयत्ता ९ वीतील विद्यार्थिनी सना रहमत मंसूरी हिने फेन्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आयोजित खेलो इंडिया महिला फेन्सिंग लीग (ASMITA initiative) मध्ये सनाने अंडर-१७ आणि अंडर-१९ या दोन्ही गटांमध्ये 🥇 सुवर्ण पदके पटकावून मानाचा तुरा मिळवला.

नगराध्यक्ष श्रीमती मधुरा मदनकर व उपाध्यक्ष श्रीमती चंद्रकला भोपे यांच्या हस्ते सनाला पारितोषिक प्रदान करण्यात आले.

यावेळी नगर परिषद, भंडारा येथील मुख्य अधिकारी जुम्मा प्यारेवाले, शाळेचे मुख्याध्यापक अजीज अहमद, मुश्ताक शेख तसेच सर्व हायस्कूल स्टाफ यांनी  विद्यार्थिनीच्या या यशाचे कौतुक करत शाळेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या