चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या फेरबदल केले आहेत. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. (भाप्रसे) यांची छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. ते विद्यमान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या जागी राहणार असून, स्वामी यांना कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करण्यात आले आहे. त्याचबरोबर, विनय गौडा यांच्या जागी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत (भाप्रसे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासनाच्या आदेशानुसार, विनय गौडा यांनी तातडीने छत्रपती संभाजीनगरचा कार्यभार दिलीप स्वामी यांच्याकडून स्वीकारावा, तर चंद्रपूरचा कार्यभार वसुमना पंत यांच्याकडे सोपवावा. बदली झाल्यानंतर कार्यभार हस्तांतरणाबाबतच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या आदेशाला सह सचिव सुभाष उमराणीकर यांनी मंजुरी दिली आहे.वसुमना पंत यांनी यापूर्वी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. रेशीम संचालनालय नागपूर येथे संचालक म्हणून कार्यरत होत्या. वसुमना नागपूर येथे महासंचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.


0 टिप्पण्या