चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली : पंचशील वार्ड प्रभाग क्रमांक ५ येथे शिवलिंग मंदिर उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा पार पडला. नगरसेवक तथा गटनेता संदीप बावनकुळे यांच्या प्रयत्नातून या मंदिरास मंजुरी मिळाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्ष देवश्री कापगते नगरसेवक मेघा बडवाईक यांची उपस्थिती प्रमुख होती.
कार्यक्रमात बोलताना संदीप बावनकुळे यांनी सांगितले की, पंचशील वार्डातील नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण होत असून हे मंदिर भविष्यात धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे केंद्र बनेल. दिलेला शब्द मी पूर्ण केला याचे मला समाधान आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे हे कार्य शक्य झाले. मंदिर उभारणीमुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण अधिक बळकट होणार असून नागरिकांना एकत्र येण्यासाठी एक पवित्र स्थळ उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमाला राम मेश्राम, पद्माकर डोमळे, प्रकाश मस्के, योगराज समरीत, सुभाष क्षिरसागर, दिलीप झिंगरे, डॉ. कृष्णा मेश्राम, महेश हत्तीमारे, पंकज शिवणकर, कृष्णा बडवाईक, पिंटू लाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजीव समरीतआभार प्रदर्शन थालीराम जंजाळ यांनी केले. कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


0 टिप्पण्या