Ticker

6/recent/ticker-posts

जितू मुंडा यांना अखेर बहिणीच्या खात्यातील पैसे मिळाले, पण नेमकं काय घडलं?


चित्रा न्युज ब्युरो
 भुवनेश्वर :-ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यतील पाटणा तालुक्यातील मल्लिपोशी गावात 'ओडिशा ग्रामीण बँके'च्या शाखेत घडलेली एक घटना व्हायरल झाली आहे. बँकेच्या अधिकाऱयांनी सांगितले म्हणून जितू मुंडा आपल्या मृत बहिणीची कबर खोदून तिचा सांगडा घेऊन बँकेत गेल्याचा हा व्हिडिओ आहे. यावरून बँक आणि एकूणच व्यवस्थेला ट्रोल केले जात आहे. बँक कर्मचाऱयांच्या वागणुकीचा सामान्य ग्राहकांना नेहमी येणारा अनुभव पहाता लोकांच्या या भावना समजण्यासारख्या आहेत. व्हिडिओ व्हायरल होऊन चर्चा झाल्यानंतर बँकेने मुंडा यांच्यासह इतर कायदेशीर वारसांना मृत बहिणीच्या खात्यातील रक्कम परत केली आहे.

जितू मुंडा यांची विवाहित बहीण कलरा मुंडा काही काळापासून माहेरीच राहत होती. तिचा मृत्यू झाला, तेव्हा दफन करण्यात आले होते. मृत्यूपूर्वी तिने तिच्याकडील एक वासरू विकले होते. त्याचे १९ हजार ३०० रुपये तिने बँकेत ठेवले होते.
तिच्या निधनानंतर ते पैसे काढण्यासाठी जितू मुंडा गेले. मात्र, खात्यातील पैसे काढायचे असतील तर खातेदार स्वतः हजर पाहिजे आणि मृत झाला असेल तर मृत्यूचा दाखल हवा, अशी भूमिका बँकेने घेतली. अर्थात ती कायदेशीरदृष्टया योग्यही आहे. मात्र, आदिवासी आणि अशिक्षित असलेल्या मुंडा यांना समजण्यात गफलत झाली, किंवा बँकेच्या अधिकाऱयांना धडा शकविण्यासाठी किंवा अन्य कोणत्या रागतून त्यांनी चक्क कबर खोदून सांगाडा आणला असावा.
बँकेच्या अधिकाऱयांच्या मतानुसार मुंडा हे एकमेव वारसदार नव्हते. इतरही वारसदार होते. तेही बँकेत पैसे काढण्यासाठी येऊन गेले होते. त्यांनाही हेच सांगण्यात आले होते. जेव्हा मुंडा आले, तेव्हाही त्यांनी सुरवातील बहीण मृत झाल्याचे सांगितले नाही. बहीण अर्धांगवायूने आजारी आहे, त्यामुळे ती येऊ शकत नाही, असे बँकेला सांगितले. त्यावर बँकेचे अधिकारी घरी येऊन खात्री करतील, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, नंतर मुंडा यांनी बहीणाीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आधीच इतर नातेवाईक पैसे मागण्यासाठी येऊन गेलेले. त्यात संदिग्ध माहिती देत मुंडा आलेले. त्यामुळे बँकेने अधिक सावध भूमिका घेतली असावी. येथे वारसदारांमध्येही मतभेद असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे पुरावा म्हणून थेट बहिणीचा सांगाडाच घेऊन येण्याची कृती जितू मुंडा यांच्याकडून घडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

मात्र, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर बँकेच्या अधिकाऱयांनी तातडीने तपास केला. कागदपत्रे जुळविली आणि जितू मुंडा यांच्यासह कलरा यांच्या इतर २ कायदेशीर वारसांकडे कलरा यांच्या खात्यातील पैसे सुपूर्द केले. ते आपसांत वाटून घेण्यासही सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या