Ticker

6/recent/ticker-posts

वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार यांचा सत्कार समारंभ साजरा

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती:-उपजिल्हा रुग्णालय मोर्शी चे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद पोतदार यांची जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग अकोला मंडळ विभाग संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांनी मोर्शी आणि वरुड रुग्णालयात रक्तदान चळवळ राबवून हजारो बाटल्या रक्त संकलित करण्याचा विक्रम केला असून महिलांच्या गर्भपिशवी शस्त्रक्रिया तसेच हर्निया, हायड्रोसील सारख्या शस्त्रक्रिया करून सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आली आहे. 
          या निवडीबद्दल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन कोरडे तसेच हिवताप, हत्तीरोग कर्मचारी विनय शेलुरे, रितेश कुकडे, प्रकाश मंगळे, प्रशांत बेहरे, सुजित वानखेडे, आशिष पाटील,वसीम शेख, वैशाली घोगरे, अंकित पाटील, नंदू थोरात अक्षय शेवाळे, ऋषिकेश दहेकर, विनोद डहाके आशिष नेरकर व रुग्णालयातील इतर कर्मचारी यांनी त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या