मासेमारी बांधवांचा प्रश्न
काँग्रेस तर्फे निवेदन
रवि भोंगाने चित्रा न्युज
साकोली: :-गत१ ऑगस्ट २०२५ रोजी फुटलेली तलाव पाळ दुरुस्त करण्यासाठी आमदाराच्या अथक प्रयत्नातून निधी मंजूर झालेला आहे. ४ करोड १ लक्ष ४४ हजार रुपये असा हा निधी आहे. मात्र या कामाला सुरुवात केव्हा होणार ? असा सवाल मासेमारी बांधवांनी केलेले आहे. सध्या हा निधी मंजूर करण्यात आल्याबद्दल दोन्ही आमदाराचे आभार मासेमारी बांधवांनी मानले आहे. या संदर्भात ७ दिवसाच्या आत काम सुरू करा अशा प्रकारचे निवेदन साकोली नगरपरिषदेचे नगरसेवक गटनेता संदीप बावनकुळे यांनी आपल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळ तर्फे भंडारा जिल्हाधिकारी यांना दिलेले आहे.
_____________________________________________
नेमके श्रेय कोणाचे ?
गतवर्षी फुटलेल्या तलाव पाळीचा बांधकाम निधी पावसाळा तोंडावर असताना मंजूर झाला. निधी मंजूर होणे आणि तो प्रत्यक्षात येणे यात बरीच तफावत आहे. त्यातही पावसाळा तोंडावर आहे. सदर निधी आमदार नाना पटोले आणि आमदार डॉ.परिणय फुके यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झाला आहे असे त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर दावा केलेला आहे. त्यामुळे साकोलीच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. परंतु काँग्रेस आणि भाजपचे कोणतेही कार्यकर्ते प्रत्यक्षात प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन हमखासपणे सांगायला कुणीही तयार नाहीत. तरीही या निमित्ताने साकोलीकरांनी दोन्ही आमदारांचे अभिनंदन केले आहे. आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी फुटलेल्या तलाव पाळीचे बांधकाम सुरू होणार करण्याचे श्रेय कोण घेणार याकडे मात्र साकोलीच्या नागरिकांची उत्सुकता लागून आहे.
_______________________________________________
वृत्तपत्रातील बातमीचा आधार का घ्यावा लागतो ?
स्थानिक राष्ट्रीय महामार्गावर जवळपास ८० ते ९० एकराचा मालगुजारी तलाव आहे. या तलावात पावसाळ्यात पाणी साठलेकी मासेमारी बांधव मासोळी बिजारोपण करतात आणि दिवाळीनंतर वर्षभर लाखो रुपयाचे उत्पादन घेत असतात. दुसरीकडे याच तलावाला लागून शेतकऱ्यांची शेती आहे. त्यामुळे उन्हाळी धान पिकासाठीसुद्धा त्यांना या तलावातील पाण्याचा फायदा होतो. सदर तलावात वर्षभर पाण्याचा साठा राहत असल्याने तलावाला लागून असलेल्या सार्वजनिक आणि खाजगी कुपनलिका, विहीर, बोरवेल यांना पाण्याची पातळी लागून असते. त्यामुळे या परिसरात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासत नाही. मात्र यावेळी तलाव पूर्ण रिकामा झाल्याने तलाव परिसरात टँकरने पाणीपुरवठा करणे सुरू आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्ये या तलावाची पाठ फुटली. तेव्हा समस्त राजकीय प्रतिनिधींनी तलाव पाळीला भेट देऊन शेतकऱ्यांना आणि मासेमारी बांधवांना आश्वासन दिले होते. वास्तविक बघता तलाव फुटल्यानंतर काही महिन्यातच हा निधी मंजूर करून देऊन पावसाळा संपल्यानंतर काम सुरू करण्यात यायला हवे होते. मात्र सर्वच राजकीय प्रतिनिधी त्यावेळी हातावर हात ठेवून बसले. मात्र वृत्तपत्रात तलाव पाळीच्या बांधकाम संदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच सर्वच राजकीय प्रतिनिधी खडबडून जागे झाले. वृत्तपत्रात बातम्या उमटल्यानंतर २ दिवसात निधी मंजूर होत असेल तर ९ महिन्याचा कालावधी का लागला ? खरंच यावर्षी पावसाळ्याच्या पूर्वी कामाला सुरुवात होईल का ? आणि प्रत्यक्षात या कामाचा निधी यायला किती वेळ लागेल हे कुणीतरी सांगणार काय ?
______________________________________________
७ दिवसांत फुटलेल्या तलाव पाळीचे काम सुरू करा
साकोली शहर व परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मुख्य आधार असलेला साकोली तलाव. या तलाव पळीची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे. ७ दिवसांच्या आत आवश्यक निधी उपलब्ध करून तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू करण्यात यावे अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा लोकप्रिय विकास आघाडीचे गटनेता तथा नगरसेवक संदीप बावनकुळे यांनी दिला आहे. या संदर्भात बावनकुळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन सादर करण्यात आले. दिलेल्या निवेदनात गेल्या काही दिवसांतील पावसामुळे साकोली तलावाच्या पाळीला मोठ्या प्रमाणात तडे गेले असून भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाळा तोंडावर असताना दुरुस्ती न झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा व मासेमारी करणाऱ्या ढीवर बांधवांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण राहणार आहे. आता केवळ आश्वासने नकोत तर प्रत्यक्ष काम झाले पाहिजे. ७ दिवसांत निधी उपलब्ध करून काम सुरू झाले नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात नगरसेवक/नगरसेविका त्रिवेणीताई चौधरी, कुणाल राऊत, निर्मला नंदेश्वर, स्मिता सिडाम, सायली दोनोळे यांचा समावेश होता.


0 टिप्पण्या