चित्रा न्युज प्रतिनिधी
अकोला : पेट्रोल, डिझेल नागरिकांवरील आर्थिक भार वाढत आहे केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे सर्वसामान्य तसेच घरगुती गॅस सिलिंडरच्या, पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, सतत वाढणाऱ्या किमती, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे नागरिकांचे वस्तूंच्या टंचाईविरोधात जगणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 25 मे रोजी अकोल्यात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र राज्य सरकार विरुद्ध मोर्चा काढण्यात आला.
ह्या भव्य बैलगाडी मोर्चा मध्ये सायकल, गाढव, घोडे, घोडागाडी, बैलगाडी आणि मोठ्या संख्येत सरकारला महागाई नियंत्रणात आणण्यात अपयश झाले याचा निषेध करत वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय भव्य मोर्चा काढण्यात आला. अकोल्यातील 45 डिग्री उन्हात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात आज, २५ मे रोजी अकोला येथे भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात बैलगाड्या, गाढवे, सायकली आणि घोडे यांचा वापर करून केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.
पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलिंडर, खाद्यतेल तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असल्याचे आंदोलकांनी म्हटले. महागाई नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचे सांगत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाच पदाधिकारी जाऊन जिल्हाधिकारी ह्यांना निवेदन देणार नाही, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडी नेते ह्यांनी घेतली. जिल्हा प्रशासन मोर्चात येऊन निवेदन घ्यावे असा आग्रह धरल्याने निवासी उपजिल्हाधिकारी यांनी मोर्चात येऊन निवेदन स्वीकारले. अधिकारी मोर्चाला सामोरे जाऊन निवेदन स्वीकारणे हे पहिल्यांदा घडले.
मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. बैलगाडी आणि प्राण्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलनाने शहरवासीयांचे विशेष लक्ष वेधून घेतले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश युवक आघाडी महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, युवक अध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, महिला आघाडी अध्यक्षा आम्रपाली खंडारे, महासचिव संगीता अढाऊ, नंदकुमार डोंगरे, धीरज इंगळे, सिद्धार्थ देवधरीकर, निलेश देव, मझहर खान, गजानन गवई, दामोदर जगताप, डॉ. धर्माळ गोरसिंग राठोड, सुनील सरदार, चरण इंगळे, अशोक दारोकार, किशोर जामनीक, पवन बुटे, सुगत डोंगरे, अनुराधा डांगे, राहुल इंगळे, सम्राट तायडे, वैशाली कांबळे , लक्ष्मी वानखडे, अक्षय राऊत, आशिष रायबोले, सुनिता हेरोडे, आकाराम मोरखडे, जिया शहा, विद्या शामस्कर, मिलिंद दामोदर, मंगला शिरसाट सुरेश गवई, नाजूक दारोकार सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या