चित्रा न्युज प्रतिनिधी
पुणे : पुण्यात उद्या (26 मे) रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार असल्याचे पुणे पोलीस आयुक्तालयाने जाहीर केले आहे. त्यानुसार पुण्यात 14 दिवस जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचा हा आदेश 26 मे 2026 पासून 8 जून 2026 पर्यंत लागू राहणार आहे. या जमावबंदीच्या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलनं आणि सभा घेण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रम झाल्या आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
पुणे पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणं, सार्वजनिक ठिकाणी सभा घेणं, मोर्चे किंवा मिरवणुका काढणं यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
तसेच तलवार, भाला, काठी, लाठी, बंदूक किंवा शारीरिक इजा करू शकतील अशा कोणत्याही वस्तूंना सार्वजनिक ठिकाणी सोबत बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोणतेही दाहक, स्फोटक आणि ज्वलनशील द्रव पदार्थ सोबत नेण्यावर निर्बंध असतील. सार्वजनिक शांतता भंग करू शकतील अशा घोषणा देणं, चिथावणीखोर गाणी किंवा वाद्य वाजवणं यावरही बंदी करण्यात आली आहे.


0 टिप्पण्या