चित्रा न्युज प्रतिनिधी
नाशिक : कुऱ्हेगाव येथील 16 वर्षांची अल्पवयीन दिया योगेश धोंगडे या मुलीचे 26 मार्च 2026 रोजी अपहरण झाले. दिया धोंगडेंच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, दिया घरातून गायब झाल्यानंतर संपूर्ण परिसर आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती सापडली नाही.
पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली असतानाही पोलीस तपासाला प्राधान्य देत नाहीत, ज्यामुळे कुटुंबीयांमध्ये संशय आणि असंतोष निर्माण झाला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे आणि नगरसेवक अजय वाहने यांनी पोलीस अधीक्षक ग्रामीण यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनाद्वारे दिलासा मागितला आहे.
अप्पर पोलीस उपअधीक्षक ग्रामीण मिरखेलकर यांनी स्पेशल गुप्तचर विभागाकडून जलद तपास करण्याचे आश्वासन दिले. चेतन गांगुर्डे यांनी पत्रकारांना सांगितले की, मराठा समाजातील या घटनेवर इतर राजकीय पक्षांनी दखल घेतलेली नाही, त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आंदोलनासाठी सज्ज आहे.
महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड यांनीही तपासात उशीर झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


0 टिप्पण्या