चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-ग्राहकांकडून वस्तूवर अवाजवी किंमत आकारली जाऊ नये म्हणून एमआरपी अर्थात मॅक्झिमम रिटेल प्राइस ही संकल्पना मानली गेली. परंतु, आज प्रत्यक्षात हीच व्यवस्था अनेक ठिकाणी ग्राहकांच्या आर्थिक शोषणाचे व्यासपीठ बनली आहे. ही लूट थांबवण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने पुढाकार घेतला असून याचाच एक भाग म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे या निमित्ताने लवकरच संपूर्ण देशात राष्ट्रीय,राज्य व जिल्हा स्तरावर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्वत्र लोकशाही मार्गाने ठिकठिकाणी जन आंदोलन केले जाणार असल्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या संदर्भात मा.डॉ. श्री प्रशांत जी पडोळे,खासदार(भंडारा/गोंदिया लोकसभा क्षेत्र)यांना एमआरपी नियंत्रण चळवळीचे निवेदन सादर करतांना अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पश्चिम क्षेत्र संघटक श्री नितिन काकडे यांनी या विषयांवर मा.खासदार यांचे सोबत विस्तृत चर्चा करून सदरचा विषय लोकसभे मध्ये केंद्र शासनाच्या समोर मांडण्यासाठी विनंती करण्यात आली.भेटी दरम्यान अ.भा.ग्रा.पं.चे सर्वश्री जयंत सब्जीवाले ,रविन्द्र तायडे, अनिल शेंडे, संजय आयलवार, मोहम्मद सईद शेख, राजेश पांडे, रमेश पारधी इत्यादी पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.


0 टिप्पण्या