Ticker

6/recent/ticker-posts

भद्रावती नगर परिषदेचा बुलडोझर: ओपन स्पेसवरील अतिक्रमण जमीनदोस्त

ले-आऊट धारकाने अडवला होता नागरिकांचा रस्ता; नोटीस देऊनही कारवाई न झाल्याने अखेर जेसीबी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती :नागरिकांचा रस्ता अडवून ओपन स्पेसमध्ये केलेले अतिक्रमण भद्रावती नगर परिषदेने जेसीबी लावून जमीनदोस्त केले. ले-आऊट धारकाने संरक्षण भिंत बांधून रस्ता बंद केल्याने वॉर्डवासीयांना मनस्ताप सहन करावा लागत होता. अखेर 13 मे रोजी नगर परिषदेने कारवाई करत रस्ता मोकळा केला.

भु. मा. क्र. 63 आणि 68 (जुना 107/4) येथील ले-आऊट धारक अतुल गुंडावार यांनी भु. मा. क्र. 63 मधील ओपन स्पेसमध्ये जाणाऱ्या रस्त्यावरच संरक्षण भिंतीचे बांधकाम केले होते. त्यामुळे नागरिकांना ओपन स्पेसमध्ये जाण्यास अडचण निर्माण झाली होती. याबाबत नागरिकांनी नगर परिषदेकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनंतर नगर परिषदेने ले-आऊट धारकाला अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याबाबत नोटीस दिली होती. मात्र यांनी केराची टोपली दाखवली होती. मुदत देऊनही अतिक्रमण हटविण्यात आले नाही. अखेर मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांच्या नेतृत्वात 13 मे रोजी कारवाई करण्यात आली.

या कारवाईत रचना सहायक वैभव सावरकर, भुजंग पोटे यांनी पुढाकार घेतला. नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे गुप्ता, महाकुलकर, काळे, आरोग्य विभागाचे ब्राह्मणे व सोनू बोथरा, न.प. कर्मचारी तसेच पोलिस ताफा उपस्थित होता.


---------- --------------------------
भद्रावती न.प. ॲक्शन मोडमध्ये! ओपन स्पेसचा रस्ता अडवणारी भिंत जेसीबीने पाडली. नागरिकांची तक्रार, नोटीसनंतरही कारवाई नाही, शेवटी बुलडोझर चालला. मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांच्या नेतृत्वात कारवाई.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या