Ticker

6/recent/ticker-posts

जार पाण्याचा त्यात माल हातभट्टीचा..!महिला आरोपीविरुध्द गुन्हा दाखल..


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप नांदेड,पोलिस अधिक्षक अमोल तांबे लातुर यांनी अवैध धंदेविरोधी मोहिम तीव्र केली आहे.आणि यासाठी विविध ठाण्याच्या हद्दीत पथके निर्माण केले आहेत. आणि या पथकांचा चांगला रिझल्ट येत असलातरी ही अवैध धंदे करणारे विविध युक्त्या वापरत असल्याचा अनुभव नुकताच वाढवणा बु.पोलिसांना आला आणि प्लॅस्टिकच्या जार मधून गावठी हातभट्टी दारु विक्री करत असताना मिळून आल्याने एका महिलेवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणात डोंगरशेळकी तांड्यातील एका महिलेला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिस सुञांकडून मिळालेली माहिती अशी की,वाढवणा ठाण्याच्या हद्दीतील डोंगरशेळकी तांडा येथील एक महिला स्वत:च्या फायद्यासाठी पाण्याच्या जार मधून गावठी हातभट्टी दारु विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस पथकाने रेड केली.आणि डोंगरशेळकी तांड्यातील आरोपी महिला नामे वैशाली लक्ष्मण पवार (वय.४० वर्ष) राहणार डोंगरशेळकी तांडा ही गावठी हातभट्टीची दारु विक्रीचा चोरटा व्यवसाय करत असल्याचे मिळून आली.या आरोपी महिलेजवळून पांढ-या रंगाच्या पाण्याच्या २० लिटर प्लॅस्टिक जार मधून आंबट,उग्र वासाची दोन हजार रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली असून आरोपी महिलेविरुध्द बालाजी हुलाराम अक्केमोड (पो.काॅ) यांनी फिर्याद दिली म्हणुन पो.स्टे.वाढवणा बु. येथे गुरनं.१३३/२०२६ कलम.६५ (अ)(ई) महाराष्ट्र दारु बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून याचा पुढील तपास अंमलदार संजय कलकत्ते हे करत आहेत.
*गत कांही दिवसापासून वाढवणा पोलिस अवैध धंद्याविरुध्द कडक भुमिका घेत असल्याचे दिसते.माञ,तंटामुक्तीच्या माजी अध्यक्षाच्या "पप्लू" नावाने चालणा-या पत्त्यांच्या कल्बवर कारवाईस का कचरते?असा सवाल कांही जाणकार हाळीकर जय प्रकाशच्या बाकड्यावर बसून एकमेकांना विचार होते.*
ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार व अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येत असून लवकरच हाळीतील त्या जुगार अड्यावर धाड टाकण्यात येईल.अशी माहिती सपोनि.गायकवाड एस.पी.यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या