Ticker

6/recent/ticker-posts

बल्लारपूर येथे नरवीर शिवाजी काशीद यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : स्वराज्यासाठी स्वतःचे बलिदान देणारे शिवरक्षक नरवीर शिवाजी काशीद यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त बल्लारपूर येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम दिनांक ७ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता नगरपरिषद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आयोजित करण्यात आला होता.
“लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे” या अमर विचारांना सत्यात उतरवणाऱ्या नरवीर शिवाजी काशीद यांना यावेळी उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री विठ्ठल रुक्मिणी श्री संत नगाजी महाराज मंदिर समिती, बल्लारपूर-बामणी तसेच जय जिवाजी क्रांती सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष डॉ. अल्काताई अनिल वाढई होते . प्रमुख अतिथी म्हणून इंजी. राकेश सोमाणी (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, चंद्रपूर) तसेच रवीभाऊ येसेकर (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, चंद्रपूर) उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक प्रणित  सातपुते, जय जिवाजी क्रांती सेना व मंदिर समितीचे अध्यक्ष गणेश वनकर, उपाध्यक्ष मिथुन हनुमंते, कार्याध्यक्ष डॉ. प्रशांत वाटकर, संघटक प्रमुख शंकर चौधरी, कोषाध्यक्ष अमोल राजूरकर , संचालक सुरज नागतुरे, सहसचिव निलेश घुमे, सल्लागार अरुण पालीकोंडावर, शिवशंकर दर्वे, पुरुषोत्तम नागतुरे, बल्लारपूर सलून संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेशस्वामी सूत्रलवार, माजी अध्यक्ष उमेश कोपावार, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे शहराध्यक्ष पप्पू जंम्पलवर, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता रोहित छुटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच संजय पंदिलवार, गजानन चांदेकर, प्रतीक वाटकर,गणेश सैदाणे, सत्यमनारायण मुत्यालवार, कृष्णाजी एनगंदलवार, महेश चेंणेकर, रवी कोत्तागट्टूवार, महेश मुरारी, प्रफुल वाणकडे, शंकर एनगंदलवार, रघुपती धुबाळा, भूमया विलासग्राम यांच्यासह मोठ्या संख्येने नाभिक समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या