Ticker

6/recent/ticker-posts

सोनम श्रीकांत वासनिक यांची " नागपूर शहर महिला कॉन्स्टेबल( पीसी )पदी नियुक्ती.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
कामठी  :  रविवार दिनांक -१०/०५/२०२६ कामठी शहरातील क्रांतिकारी संत कबीर वाचनालय अभ्यास करून सोनम श्रीकांत वासनिक ( कु सोनम शिशुपाल मेश्राम ) त्यांचे लग्न २०१४ मध्ये झाले तेव्हा ती बारावी पास होती. परंतु सरकारी नोकरी करावी असे स्वप्न मनी बाळगून, जिद्द चिकाटी आणि ध्यास महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून संत कबीर वाचनालयात अभ्यास नियमित करायची. एम ए अर्थशास्त्र शिक्षण घेऊन अति कठीण परिस्थितीवर सामना करून संसाराच्या गाळा सांभाळून, सासू सासरे पती आणि लहान मुलगा यांना सांभाळून स्वप्न पूर्ण करून ओपन " नागपूर शहर महिला कॉन्स्टेबल पदी निवड झाल्याबद्दल क्रांतिकारी संत कबीर वाचनालय समितीतर्फे भारतीय संविधान ग्रंथ भेट, पेन  देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी समिती अध्यक्ष प्रदीप फुलझे ले, चक्रधर रामटेके, भीमराव नंदेश्वर, रामचंद्र धोंगडे, भाऊराव सुखदेवे, नरेंद्र वाघमारे, अरविंद बोरकर, विनायक मंडपे, लक्ष्मण रामटेके, नंदकिशोर मानकर, चंद्रशेखर मानकर, माणिक सूर्यवंशी, रत्नमाला ढोके, इंदिरा वासनिक, रजनी धोंगडे, राजश्री फुल झे ले, प्रबोधनकार भीम शाहिर तथा पत्रकार प्रदीप कडबे,वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या