Ticker

6/recent/ticker-posts

पावसाळा तोंडावर,नाले सफाई वा-यावर हाळी ग्रा.पं.चा कारभार


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-उदगीर तालुक्यातील सर्व पक्षीय तालुका ते राज्य पातळीवरील मोठ,मोठे पक्षपदाधिकारी (पुढारी) असलेल्या हाळी गावातील सामान्य जनतेला यावर्षी पावसाळ्यात विविध समस्या,रोगराईचा सामना करावा लागण्याची भीती तुंबलेल्या नाल्या,पसरलेली दुर्गंधी,कचरा याकडे बघून जनतेला वाटते.आणि या समस्या सोडवाव्यात म्हणुन इंडियन पॅंथर सेना दि.१० जुन रोजी हाळीच्या ग्रापंवर मोर्चा काढणार आहे.असा इषारा इंडियन पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष इतिहास दादा कांबळे यांनी प्रशासनाला दिलेल्या लेखी निवेदनात दिला आहे.
यंदाचा पावसाळा अवघ्या १५ दिवसावर आला आहे.
तरीही गावातील तुंबलेल्या गटारी,पसरलेला कचरा अद्यापही ग्रा.पं.ने साफ केले नाही.म्हणुन "एक ना धड,भाराभर चिंध्या" असे गावात असलेल्या पुढा-यां बद्दल पॅंथर इतिहास दादा कांबळे यांनी आपले मत या प्रतिनिधी जवळ बोलताना व्यक्त केले.
पावसाळ्याच्या तोंडावर गावात नाल्यांची स्वच्छता करणे प्रत्येक ग्रा.पंचायतचे आद्यकर्तव्य असते.परंतू हाळीत तुंबलेल्या नाल्या व सर्वदुर पसरलेली दुर्गंधी पाहता या कर्तव्याचा विसर ग्रा.पं.ला पडल्याचे दिसते.
गत पावसाळ्यात तुंबलेल्या गटारीतले घाण पाणी कांही कुटूंबांच्या घरात,माजघरात शिरले होते.आणि याची माहिती असूनही आणि पावसाळा तोंडावर आलाय तरीही नाले सफाई करत नसल्याने गावक-यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून आगामी निवडणुकीतुन या नाराजीचा 'स्फोट' होण्याची शक्यता नाकारता येत नाही

हाळीतील नाल्यांमध्ये पान वेली,कॅरिबॅग,कचरा,गाळ जमल्याचे दिसून येते.
यामुळे नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये जमा झालेले दिसते.आणि याची माहिती असूनही ग्रा.पं.प्रशासन झोपेच्या बाबतीत कुंभकर्णाचेही बाप निघाले!
असा संतप्त सुर जनतेतून निघत आहे.
तेंव्हा ९ जुन पुर्वी गटारींची स्वच्छता व दुरुस्ती करावी अन्यथा १० जुन रोजी ग्रापं. कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.असे उपजिल्हाधिकारी,उदगीर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर इंडियन पॅंथर सेना लातुर जिल्हाध्यक्ष इतिहास दादा कांबळे, तालुकाध्यक्ष किंवडे मच्छिंद्र,उपाध्यक्ष प्रकाश तेलंगे यांचे नाव व सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या