अनेक सुविधांचा अभाव
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा -पवनी तालुक्यातील अड्याळ येथील सेंट्रल बँकेचे उपव्यवस्थापक यांच्या मनमानी कारभाराला ग्राहक त्रस्त आलेले आहेत .याबाबत सविस्तर वृत्त असे की ,अड्याळ मध्ये एकमेव असलेली राष्ट्रीयकृत बँक असलेली सेंट्रल बँक मध्ये असुविधा असून वृद्धा पासून तर सुजाण नागरिकांपर्यंत त्रास असल्याचे दिसून येत आहेत. मुख्यता बँकेचे उपव्यवस्थापकव हे सुजाण लोकांना त्रास देत असल्याचे सांगितले जात आहे. एखादा फिक्स डिपॉझिट एफडी बनविण्यासाठी सहा ते आठ दिवस लागत आहे असून त्या ग्राहकांना बँकेच्या फिरा माराव्या लागत असल्यामुळे विनाकारण त्रास सहन करावा लागतो.अड्याळ मध्ये मोठी बाजारपेठ, मोठी व्यापारी बँक असलेली सेंट्रल बँक शाखा चे उपव्यवस्थापक बेडेकर काम करीत नसल्यामुळे व ग्राहकांना विनाकारण भुदंड पडत असल्यामुळे आलेल्या या बँक मध्ये योग्य सोयी सुविधांचे फलक बँकेमध्ये लागले आहेत. परंतु ते फलकावर नाममात्र दिसून येत आहेत . या बँकेत वयोवृत्त महिला, पुरुष ,सकाळी 10 वाजेपासून उन्हामध्ये उभे रांगेत रोडवर उभे राहतात. त्यांना ना पिण्याच्या पाण्याची सोय, त् संडास, बाथरूम ची सोय नसल्यामुळे भर उन्हात उन त्यांना रांगेत उभे राहावे लागते .ही बँक राष्ट्रीयकृतअसून यात गाड्यांना पार्किंग सुविधा नाही . या सेंट्रल बँक विषयी ग्रामपंचायत मध्ये अनेक ठराव झालेली असून याकडे बरीच अधिकारी कानाडोळा करीत आहेत.


0 टिप्पण्या