समाजबांधवांची ऐतिहासिक गर्दी;उन्हाची तमा न बाळगता महिला अन् तरुणांची विक्रमी उपस्थिती; नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे सन्मानपूर्वक वाटप


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड:अखिल भारतीय पद्मशाली संघम, हैदराबाद संलग्नित मराठवाडा पद्मशाली महासभेच्या अंतर्गत असलेल्या नांदेड जिल्हा पद्मशाली समाज संघटनेचा प्रौढ, युवक व महिला संघटनेचा भव्य कार्यकारिणी विस्तार आणि प्रबोधन मेळावा नुकताच प्रचंड उत्साहात पार पडला. भर उन्हाची आणि प्रचंड उकाड्याची तमा न बाळगता, जिल्ह्यातील समाजबांधवांनी आणि महिलांनी लावलेल्या विक्रमी हजेरीमुळे हा मेळावा म्हणजे पद्मशाली समाजाच्या वज्रमुठीचे आणि अभूतपूर्व एकतेचे जिवंत प्रदर्शन ठरला. या व्यासपीठावरून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी अनेक क्रांतीकारी निर्णय घेण्यात आले असून, असंख्य समाजबांधवांच्या आणि पालकांच्या मागणीचा आदर करत संघटनेच्या वतीने पहिला मोठा सामाजिक उपक्रम म्हणून येत्या रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता मातोश्री मंगल कार्यालय, कौठा, नांदेड येथे भव्य राज्यस्तरीय उपवधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या मेळाव्यासाठी मराठवाडा युवक संघटनेचे अध्यक्ष व समाजभूषण श्री. गोविंदशेठ कोकुलवार यांनी आपले वडील स्व. तुळशीरामजी नागनाथराव कोकुलवार यांच्या स्मरणार्थ संपूर्ण सभागृह विनामूल्य उपलब्ध करून देत आपल्या दानशूर वृत्तीचा पुन्हा एकदा परिचय दिला आहे.
या मेळाव्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे समाजबांधवांचा मिळालेला उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद. कार्यक्रम सुरू होताच सभागृह अपुरे पडले आणि शेकडो कार्यकर्त्यांना सभागृहाबाहेर उभे राहून नेत्यांचे विचार ऐकावे लागले. जनसमुदायाचा हा अथांग सागर पाहून आयोजकांनी, समाजाची ताकद आता अफाट वाढली असून यापुढील सर्व कार्यक्रम हे भव्य आणि विस्तीर्ण मोठ्या हॉलमध्येच आयोजित केले जातील, असा जाहीर शब्द दिला. याच दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याच्या मजूर संस्थेवर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल लेबर फेडरेशनचे चेअरमन श्री. लक्ष्मीकांत गोणे यांचा समस्त समाजबांधवांच्या वतीने फेटा बांधून व सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच, समाजातील खंबीर व प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व श्री. रुक्माजी बालाजी यलगंद्रेवार यांची नांदेड दक्षिण पद्मशाली प्रौढ संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी अत्यंत सन्मानाने निवड करण्यात आली आणि त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या निवडीमुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा पद्मशाली महासभेचे अध्यक्ष डॉ. मारोतराव क्यातमवार होते, त्यांनी समाज संघटन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तर मुख्य मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय पद्मशाली संघमचे गौरव अध्यक्ष श्री. श्रीधरराव सुंकरवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, समाजाने आता शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातही आपली हक्काची जागा निर्माण केली पाहिजे, असा रोकठोक सल्ला दिला. या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय पद्मशाली संघमचे उपाध्यक्ष श्री. प्रल्हादराव सुरकुटवार, सचिव श्री. व्यंकटेश जिंदम, मर्कंडेय बँकेचे अध्यक्ष श्री. अशोकशेठ श्रीमनवार, मराठवाडा पद्मशाली महासभेचे महासचिव डॉ. गोविंदराव ईपकलवार, अखिल भारतीय पद्मशाली महिला संघमच्या माजी अध्यक्षा सौ. विजयाताई सुंकरवार, मराठवाडा पद्मशाली महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ. कविताताई गड्डम, महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. नागभूषण दुर्गम, नगरसेवक श्री. नागनाथ गड्डम, मार्कंडेय मंदिरचे अध्यक्ष श्री. बुरला पेंटया, नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. संग्राम निलपत्रेवार, महाराष्ट्र पद्मशाली वधू-वर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष कोंकलवार, नांदेड जिल्हा प्रौढ संघटनेचे अध्यक्ष श्री. शिवाजी अन्नमवार, नांदेड जिल्हा युवक संघटनेचे अध्यक्ष श्री. भारत गट्टेवार आणि नांदेड जिल्हा महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ. ललिता निलपत्रेवार आदी दिग्गज नेते उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री. शिवाजी अन्नमवार यांच्या धारदार प्रास्ताविकाने झाली, त्यांनी संघटनेच्या पुढील आक्रमक वाटचालीचा ताळेबंद समाजासमोर मांडला. तर संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार आणि जोशपूर्ण सूत्रसंचालन श्री. संग्राम निलपत्रेवार यांनी केले, ज्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह टिकून होता. या मेळाव्यात नवनियुक्त करण्यात आलेल्या सर्व तालुका अध्यक्षांना सन्मानपूर्वक नियुक्तीपत्रे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला, ज्यामध्ये प्रामुख्याने श्री. रुक्माजी बालाजी यलगंद्रेवार यांच्यासह विविध तालुक्यांची धुरा सांभाळणाऱ्या नव्या दमाच्या आणि तडफदार नेत्यांचा समावेश आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आणि तालुका अध्यक्षांनी व्यासपीठावरून आपल्या आक्रमक भावना व्यक्त करत समाजाच्या हितासाठी आणि हक्कासाठी २४ तास काम करण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला.
या मेळाव्याला महिला भगिनींचा आणि सक्रिय कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व सहभाग लाभला. यामध्ये प्रामुख्याने ॲड.सौ. सरस्वती शिवाजी अन्नमवार, सौ. वंदना गणेशराव गुरुपवार, सौ. अरुणा मधुकर पुरणेकर, सौ. कृष्णाबाई विठ्ठल कोरमवार, सौ. रत्नमाला बालाजी पुरणेकर, सौ. संगीता श्रीनिवास गुर्रम, सौ. उमा नरसिंग कारमपुरी, सौ. रामेश्वरी बालाजी शिवरात्री, सौ. कविता भूमाजी मामीडवार, सौ. ज्योती गोपाळ आंचेवार, सौ. गायत्री बजरंग नागलवार, सौ. पार्वती माधव चातरवार, सौ. पल्लवी कृष्णा कोकुलवार, सौ. योगिता धर्माजी इडेवार, सौ. पद्मावती दिगंबर मॅनेवार, सौ. ज्योती बालाजी तालकोकुलवार, सौ. रूपाली भारत गट्टेवार, सौ. सुनिता राजेश्वर नंदलवार, सौ. प्रवलिका अजय चौधरी, सौ. शारदा राम येमेवार, सौ. लक्ष्मीबाई चंद्रकांत अंकमवार, सौ. राखी मल्लेश कर्रे, सौ. उषाताई सुरेश नरतावार, सौ. शामा दत्ता रामदिनवार, सौ. कमल प्रकाश गाजूलवार, सौ. दीपमाला सुरकुटवार, सौ. पौर्णिमा रब्बेवार, सौ. सारिका योगेश चिवटेवार या महिला पदाधिकाऱ्यांनी आपली खंबीर उपस्थिती दर्शवली.
तसेच पुरुषांमध्ये विजय अण्णा वड्डेपल्ली, सत्यजित टिप्रेसवार, मल्लेश बाल्ला, बजरंग नागलवार, श्रीनिवास गुर्रम, मल्लेश कर्रे, अनिल कोंडलवार, मधुकर पुरणेकर, सदाशिव चलिंद्रवार, डी. एल. भुसेवार, रामदास वल्लाकट्टी, विनोद राखेवार, किरण नक्का, मनोहर लोकंम, किशन शिवरात्री, पंढरीनाथ संदपटनंमवार, माधव जलदेवार, डॉ. लक्ष्मण चन्नावार, संतोष फुलकुंटवार, साईनाथ नरतावार, केशव नुरेवार, धनंजय माडेवार, पंकज जिंदम, बालकिशन बाल्ले, संजय रच्चेवार, अंकुश गोणे, व्यंकटेश माडेवार, गंगाप्रसाद पूर्णेकर, दिनेश गुरुपवार, कृष्णा कोकुलवार, बालाजी पूर्णेकर, व्यंकटेश अमृतवार, लक्ष्मीकांत दुсеवार, जयनारायण मंचेवार, व्यंकटेश मुलुकवार, बाबू अण्णा पिचकेवार, साईनाथ चन्नावार, मारुती यलगंधलवार, प्रकाश खडकीकर, देविदास देवरकोंडा, रामेश्वर मच्छेवार, अजय चौधरी, दत्तप्रसाद सुरकुटवार, नरसिंग पंढरीनाथ, शंकर गोकावार, नागेश गोणेवार, कृष्णा तमलवार, मंगेश मॅनेवार, सुरेश राहुलवार, संजय मादसवार, गणेश रच्चेवार, संतोष ताडेवार, सुनील घंटेवार, गजानन सिरमेवार, जयप्रकाश ताटीकुंडलवार, गजानन बोड्डावार, व्यंकटेश पलिकोंडलवार, योगेश चिल्कावार, भूमाजी मामीडवार, साईनाथ कामनावर, गणेश येल्लेवार, ॲड. शैलेंद्र सुरकुटवार, चंद्रकांत अंकमवार, राजेश्वर नंदलवार, श्रीनिवास अनंतवार, शंकर येम्मेवार, पत्रकार गजानन जिद्देवार आष्टीकर, गणपत गड्डमवार, साईनाथ आल्लेवार, सतीश दोमलवार, योगेश चिल्कावार, अनिल गुडेवार, आकाश अमृतवार, बालकिशन उपरपल्ली, महेश गाजूला, महेश पेंटया, कंटेश्वर बुरला, शामराव बिंगेवार, अशोक मेरगेवार, व्यंकटेश पुलकुंटवार, नरसिंग यंगुलवार, सनतकुमार पुल्लेवार, गोपाळ आंचेवार, उमेश नागलवार, जयप्रकाश ताटीकोंडलवार, अमोल नांदलवार, योगेश कोकुलवार, नारायण येम्मेवार आणि सुनील घंटेवाड यांच्यासह जिल्ह्यातील हजारो निष्ठावान कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतरही बराच वेळ कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत होता, हा मेळावा नांदेडच्या सामाजिक इतिहासाला एक नवी आणि क्रांतिकारी दिशा देणारा ठरेल यात शंका नाही.


पत्रकार गजानन जिदेवार आष्टीकर यांची नांदेड जिल्हा युवक पद्मशाली समाज संघटनेच्या पाच वर्षाकरिता प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाली आहे ...