Ticker

6/recent/ticker-posts

जुन्या झाडांना जीवनदान देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या विशेष सहकार्याबद्दल वृक्षप्रेमींकडून आभार व्यक्त


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान वृक्षप्रेमींनी जुन्या झाडांची तोड होऊ नये म्हणून राबवलेल्या अभियानात मा. जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन, भंडारा यांनी दिलेल्या विशेष सहकार्याबद्दल "वृक्षप्रेमी ग्रुप"च्या वतीने त्यांना रोप देऊन विशेष आभार व्यक्त करण्यात आले. तसेच या कार्यात सहकार्य केल्याबद्दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री अभिषेक नामधस यांनाही रोप देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी सईद शेख, चंदा मुरकुटे, लियाकत खान, डॉ. मुबारक कुरेशी, अनिता चौधरी, मीना कांबळे आदी वृक्षप्रेमी उपस्थित होते।
कृषक व नागरिकांना आकाशीय वीजेपासून संरक्षण मिळावे यासाठी संवेदनशील भागांमध्ये व शेतांमध्ये शक्तिशाली लाइटनिंग अरेस्टर बसविण्याबाबत तसेच एल निनो, सुपर एल निनोच्या पार्श्वभूमीवर भविष्यात पावसाळ्यात अडथळे निर्माण होऊन संभाव्य दुष्काळ व भीषण जलसंकटाचा सामना करण्यासाठी शहर, गाव, घरे व कार्यालयांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रणाली अनिवार्य करण्याबाबतचे निवेदन मा. जिल्हाधिकारी, भंडारा तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री अभिषेक नामधस यांना ग्रीन हेरिटेज पर्यावरण संस्था व वृक्षप्रेमींच्या वतीने सादर करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या