पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून चोर तस्कराच चांगभल, नागरिकांना फटका
चित्रा न्युज प्रतिनिधी
माहूर- गेल्या महिनाभरापासून माहूर तालुक्यातील माहूर शहराच्या सोमवारच्या आठवडी बाजारात भाजीपाला व साहित्य खरेदी करण्यास गेलेल्या ग्राहकांचे मोबाईल लंपास होण्याचे सत्र सुरु असून दर आठवड्याला आठवडी बाजारातून चोरी गेलेल्या मोबाईलची संख्या खूप जास्त आहे. अत्यंत महागड्या किमतीचे कमाल १० हजार ते किमान १ लाख रुपये किमतीचे मोबाईल लंपास झाल्याने आठवडी बाजारातील मोबाईल चोरीची उलाढाल बाजाराच्या एकूण व्यापारा पेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. याचा नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
अनेक नागरिकांकडे मोबाईल खरेदीची बिले आयएमइ क्रमांक उपलब्ध नसल्याने त्यामधील सिमकार्ड बंद करून त्याच क्रमांकाचे सिमकार्ड नेटवर्क कंपन्याकडून मिळविण्याकरिता औपचारिकता म्हणून मोबाईल गहाळ झाल्याच्या नामधारी तक्रारी पोलीस स्टेशन ला सादर होत आहेत. एखादा पिडीत मोबाईल खरेदीच्या बिलासह आयएमइ क्रमांकासह मोबाईल चोरी गेल्याची तक्रार सादर करण्यास पोलीस ठाण्यात गेले तर त्या तक्रारीत बदल करून गहाळ झाल्याची तक्रार सादर करण्यास सांगितल्या जात असल्याचे काही पिडीत सांगतात. गत तीन आठवड्यापासून माहूरच्या आठवडी बाजारातून शेकडो मोबाईल फोन चोरीला गेल्याचे सांगण्यात येते.
पोलीस स्टेशनला मोबाईल चोरीच्या तक्रारी सादर होत असतांना सतत दर आठवडी बाजाराच्या दिवशी विशेषतः घटना घडत असतांना पोलीस प्रशासनाने सुमोटो दक्षता पथक आठवडी बाजारात सोडून सूक्ष्म निरीक्षण केले तर मोबाईल चोर सहजपणे पोलिसांच्या हाती लागून मोबाईल तस्करांच्या टोळीचा छडा लागल्याशिवाय राहणार नाही मात्र लक्षात घेतो कोण ? मागील तीन आठवड्यापासून आठवडी बाजारातून मोबाईल लंपास होण्याच्या घटनेत वाढ झाली असल्याने जनतेत प्रचंड आक्रोश असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित होत आहे.


0 टिप्पण्या