Ticker

6/recent/ticker-posts

सेवा हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम : गर्भवती महिलांना मोफत तपासणी व सोनोग्राफीचा लाभ.

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड :- ग्रामीण भागातील गर्भवती महिलांवर वैद्यकीय उपचारांचा आर्थिक भार पडू नये, या सामाजिक जाणिवेतून हिमायतनगर येथील सेवा हॉस्पिटलच्या वतीने कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या २६ तारखेला तालुक्यातील गर्भवती महिलांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी तसेच प्रत्येक गर्भवती महिलेला एक मोफत सोनोग्राफी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.ग्रामीण भागातील अनेक महिलांना आर्थिक परिस्थितीमुळे वेळेवर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करून घेणे शक्य होत नाही. ही गरज ओळखून सेवा हॉस्पिटलने हा उपक्रम सुरू केला असून त्याला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
केवळ मोफत तपासणीवरच न थांबता, सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून माता व बाल आरोग्य जनजागृती अभियान देखील सातत्याने राबविले जाते. गर्भावस्थेतील योग्य आहार, आवश्यक काळजी, नियमित तपासणी आणि वेळेवर औषधोपचार याबाबत महिलांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येते.आजच्या महागड्या वैद्यकीय उपचारांच्या काळात डॉ. विकास वानखेडे आणि डॉ. शिल्पा जाधव (वानखेडे) यांनी सुरू केलेली ही मोफत सेवा अनेक गरीब व गरजू कुटुंबांसाठी आर्थिक व मानसिक आधार ठरत आहे. या उपक्रमामुळे गर्भवती महिलांचे वेळेवर निदान होऊन माता व बाळाचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मोठी मदत होत आहे.सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणाऱ्या या सेवाभावी कार्याबद्दल हिमायतनगर तालुक्यासह परिसरातील नागरिकांकडून डॉ. विकास वानखेडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या