चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-आजच्या वेगाने विकसित होणाऱ्या आरोग्य क्षेत्रात फार्मसी शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. १२वी विज्ञान (पीसीबी/पीसीएम) नंतर विद्यार्थ्यांसाठी फार्मसी हे सुरक्षित, प्रतिष्ठित आणि प्रगतीशील करिअर म्हणून उदयास आले आहे. औषधनिर्मितीपासून संशोधन, डिजिटल हेल्थ आणि जागतिक स्तरावरील संधींपर्यंत या क्षेत्राचा मोठा विस्तार झाला आहे.
फार्मसीमध्ये औषधांचे संशोधन, उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, साठवण, वितरण आणि रुग्णांना योग्य मार्गदर्शन यांचा समावेश होतो. १२वी नंतर डी. फार्म आणि बी. फार्म हे प्रमुख अभ्यासक्रम असून पुढे एम. फार्म व पीएच.डी. करून संशोधन व अध्यापन क्षेत्रातही करिअर करता येते.
फार्मसी पूर्ण केल्यानंतर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल (क्यूसी), क्वालिटी अॅश्युरन्स (क्यूए) आणि रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट (आर अॅण्ड डी) मध्ये संधी उपलब्ध आहेत. क्लिनिकल रिसर्च आणि फार्माकोव्हिजिलन्समध्ये औषधांच्या चाचण्या व सेफ्टी मॉनिटरिंगचे काम करता येते. रेग्युलेटरी अफेयर्समध्ये औषधांना शासकीय मान्यता मिळवण्याची प्रक्रिया हाताळली जाते. हॉस्पिटल आणि कम्युनिटी फार्मसीमध्ये रुग्णांना औषध सल्ला व सेवा दिली जाते.
सध्याच्या काळात डिजिटल हेल्थ, टेलिमेडिसिन आणि ई-फार्मेसीमुळे नवीन करिअर संधी निर्माण झाल्या आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्समुळे औषध शोध व डेटा विश्लेषण क्षेत्रात मोठी प्रगती होत आहे. बायोटेक्नॉलॉजी, जीन थेरपी आणि एमआरएनए संशोधनामुळे भविष्यातील औषधनिर्मितीत नवीन दिशा मिळत आहे.
मेडिकल रायटिंग, सायंटिफिक कम्युनिकेशन, मेडिकल कोडिंग आणि हेल्थकेअर आयटी या क्षेत्रांमध्येही चांगल्या संधी उपलब्ध आहेत. फार्मा मार्केटिंग आणि बॅड मॅनेजमेंटमध्येही करिअर करता येते. तसेच मेडिकल स्टोअर, ई-फार्मसी किंवा हेल्थ कन्सल्टन्सी सुरू करून उद्योजक बनण्याची संधीही आहे.
आज फार्मसी क्षेत्र केवळ पारंपरिक नोकऱ्यांपुरते मर्यादित नसून स्किल-बेस्ड, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आणि ग्लोबल संधींनी समृद्ध झाले आहे. योग्य कौशल्ये व अद्ययावत जानाच्या आधारे विद्यार्थी या क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवू शकतात.
"फार्मसी शिक्षण हे उच्च करिअर संधी प्रदान करणारे आणि आरोग्य क्षेत्रात प्रभावी भूमिका बजावणारे क्षेत्र आहे. आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनामुळे या क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असून विद्यार्थ्यांनी कौशल्यविकासावर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे."
डॉ. ए. वाय. सहारे
प्राचार्य, बाजीरावजी कारंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी, साकोली


0 टिप्पण्या