Ticker

6/recent/ticker-posts

मध्यरात्री बुलडोझर लावून आदिवासींची घरे उद्ध्वस्त!



मानिकगड-अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

 
राजेश येसेकर चित्रा न्युज प्रतिनिधी 

चंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील मौजा कुंसुबी व नौकारी येथील आदिवासींनी मेसर्स मानिकगड सिमेंट कंपनी व अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बोगस करारनामा करून विश्वासघात व रात्री बुलडोझर लावून घरे उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप विनोद खोब्रागडे व संबंधित आदिवासींनी पत्रकार परिषदेत केला.

प्रकरण काय आहे?

1. 30/04/1979 रोजी महाराष्ट्र शासनाने मानिकगड सिमेंट कंपनीला चुनखडी उत्खननासाठी 643.62 हे. आर जमीन 50 वर्षांच्या लीजवर दिली.
2.  यापैकी कुंसुबीच्या 24 आदिवासींची 63.62 हे. आर जमीन तेव्हाही कंपनीला दिली नव्हती व आजही नाही. पेसा गाव असल्याने शासन मंजुरी देऊ शकत नव्हते.
3.  मात्र 1985 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 48 नुसार 12500/- प्रति हेक्टर भाड्याने वरचा भाग वापरण्यास दिला.
4.  कंपनीने 45 वर्षांपासून भाड्याने जमीन घेऊन मोबदला न देता अवैध उत्खनन केले. मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून पर्यावरण परवानगी नसताना महसूल बुडवला.

आदिवासींनी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठात क्रिमिनल रिट पिटीशन 657/2021 दाखल केली. नोटीस निघताच कंपनीने बोगस करारनामा करून 
10,00,000/- प्रति एकर मोबदला व 10,00,000/- घराचे देऊन कायम नोकरी देण्याचे आमिष दाखवले. या करारावर एकाही महसूल अधिकाऱ्याची स्वाक्षरी नाही.

दि. 08/02/2026 रोजी रात्री 8.00 वाजता बुलडोझर लावून घरे उद्ध्वस्त केली व अंगुठे घेऊन विश्वासघात केला, असा आरोप आहे.

मुकेश गहेलात, नविन कौशिक, राजेश झाडे व सचिन गोवारदिपे या अधिकाऱ्यांसह दलाल भारत आत्राम यांच्यावर कारवाईची लेखी मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.

राजेश बापुराव आत्राम, बापुराव मारू जुमनाके, अच्चू भिमा सिडाम, वासुदेव पांडू जुमनाके, परशुराम हिरामन आत्राम, निलकंठ देवराव आत्राम, किसन लोकीराम जाधव, खुशालमोतीराम पंधरे, सारजाबाई कोटनाके, कांताबाई आत्राम, लिंगु मारू येडमे, राजू सिडाम, विनोद खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ता व विठ्ठल जुमनाके उपस्थित होते.

----------------------------------------------
आदिवासींवर अन्याय!
 
जिवती तालुक्यातील कुंसुबी येथे मानिकगड सिमेंट कंपनीने रात्री 8 वा. बुलडोझर लावून 24 आदिवासी कुटुंबांची घरे उद्ध्वस्त केली. बोगस करार करून 45 वर्ष अवैध उत्खननाचा आरोप. मुकेश गहेलात, नविन कौशिक सह 4 अधिकाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी. विनोद खोब्रागडे यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद.



1. मानिकगड सिमेंट कंपनीची भूमिका काय? कंपनीच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेणे.

2.  जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कारवाई करणार का?

3.  पेसा कायद्याचे उल्लंघन झाले का? रात्री 8 वाजता कारवाईचे आदेश कुणी दिले?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या