चंद्रपूर जिल्ह्यातून पहिल्यांदाच राज्य पातळीवर प्रतिनिधित्व;
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर: जिमनॅस्टिकस या क्रीडा प्रकाराची जननी मानल्या जाणाऱ्या खेळाला चंद्रपूर जिल्ह्यात रुजवणारे व पहिले प्रशिक्षण सुरू करणारे कोच दुर्गराज नारायण रामटेके यांची महाराष्ट्र अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशनच्या 17 सदस्यीय राज्य कार्यकारिणीत कार्यकारी सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून पहिल्यांदाच राज्य असोसिएशनमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे.
दुर्गराज रामटेके हे चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशनचे संस्थापक प्रमुख व सचिव आहेत. जिल्ह्यात जिमनॅस्टिकसचे प्रशिक्षण सर्वप्रथम सुरू करण्याचे श्रेय त्यांना जाते. 25 वर्ष निस्वार्थी व समर्पित कार्य केल्याची पावती व सन्मान म्हणून ही निवड झाली आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव व महाराष्ट्र अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संजय शेटे व महासचिव डॉ. मकरंद जोशी, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन्मानित यांच्या शिफारशीने व सहयोगाने ही नियुक्ती झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात नॅशनल व आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टिकस खेळाडू निर्माण व्हावेत या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे. जिमनॅस्टिकस हा विश्वातील सर्व क्रीडा प्रकारांची जननी म्हणून ओळखला जातो.
दुर्गराज रामटेके यांनी आपल्या निवडीचे सर्व श्रेय संजय शेटे, डॉ. मकरंद जोशी, इंद्रजीत सिंग राठोड, आशिष सावंत, संदीप जोशी, डॉ. आदित्य जोशी, देवेंद्र राजगुरू, अमेया जोशी, डॉ. राजेंद्र शेळके व सर्व वरिष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी यांना दिले आहे.
चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशन व आयुषी स्पोर्ट्स अकादमी, चंद्रपूरसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व गौरवाचा क्षण आहे.
निवडीबद्दल असोसिएशनच्या अध्यक्षा सौ. शीतल रामटेके, निलेश गुंडावार, ऍड. राजरत्न पथाडे, आशुतोष गायनेवर, ॲड. जयंत टेमुर्डे, ॲड. युवराज धानोरकर, अशोक कामडे, आयुषी रामटेके, संजय माटे, बी. एल. करमनकर, करण डोंगरे, राकेश कुमार रॉय, दीक्षांत रामटेके, सुरेंद्र सिंग चंदेल यांच्यासह जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, पदाधिकारी व क्रीडा प्रेमींनी सर्वत्र अभिनंदन केले आहे.
--------------------------------------------------
चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा!
,भद्रावतीचे जिमनॅस्टिकस कोच दुर्गराज रामटेके यांची महाराष्ट्र अमेचुअर जिमनॅस्टिकस असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीत बिनविरोध निवड. चंद्रपूरमधून पहिल्यांदाच प्रतिनिधित्व. 25 वर्षांच्या निस्वार्थ सेवेचा सन्मान. ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे यांची शिफारस. आता जिल्ह्यातून नॅशनल-इंटरनॅशनल खेळाडू घडणार!


0 टिप्पण्या