चित्रा न्युज प्रतिनिधी
अमरावती:-उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील वैद्यकीय अधीक्षक मां डॉ प्रमोद पोतदार यांचे मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व दशकपूर्ती अभियान राबविण्यात आले हे अभियान माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे संकल्पनेतून 2016 ते 2026 या दहा वर्षाच्या कालावधीत राबविण्यात आले या अभियानाचे घोषवाक्य सुरक्षित गर्भधारणा निरोगी माता सक्षम भारत हे आहे.
या अभियानामध्ये सुरक्षित मातृत्वाला बळकटी देऊन तज्ञ डॉक्टर कडून तपासणी व सेवा सोनोग्राफी उच्च जोखीम गर्भावस्था ओळख व व्यवस्थापन सुरक्षित प्रसूती पूर्व उच्च जोखीम गर्भवती महिलेचे वैयक्तिक निरीक्षण व तपासणी पी एम एस एम ए सत्रात सहभागी होण्यासाठी घरगुती महिलांना प्रोत्साहन म्हणून मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध सुरक्षित प्रसुतीसाठी जवळच्या प्रथम संदर्भ सेवा केंद्र शी संपर्क रक्त व लघवीची सर्व आवश्यक तपासण्या लोह कॅल्शियम गोळ्या व टीडी लसीकरण पोषण संतुलित आहार व कुटुंब नियोजनाबाबत समुपदेशन इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
या कार्यक्रमांमध्ये रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर शुभम तट्टे यांनी गर्भवती मातांना सखोल मार्गदर्शन केले तसेच MCH in जयश्री मोरे यांनी उपस्थित सर्व गर्भवती मातांना सखोल मार्गदर्शन करून आवश्यक सर्व माहिती दिली यावेळी रुग्णालयाचे कर्मचारी विनय शेलुरे, प्रकाश मंगळे, प्रशांत बेहरे, कल्पना पंधरे, पुष्पा पंधरे भारती बाकडे अर्चना पवार व रुग्णालयातील इतर सर्व कर्मचारी हजर होते


0 टिप्पण्या