Ticker

6/recent/ticker-posts

कोकळगाव आरोग्य उपकेंद्राचे एक्स-रे अभियान


मुदगड एकोजी येथील 25 संशयिताचे एक्स-रे काढण्यात आले

चित्रा न्युज प्रतिनिधी 
किल्लारी -  शंभर दिवस क्षयरोगमुक्त भारत कार्यक्रमांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र कोकळगाव कार्यक्षेत्रातील मुदगड एकोजी गावातील 25 संशयित क्षयरुग्णांचे एक्स-रे काढण्यात आले व सर्व संशयित क्षयरुग्णांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. 
       यातील 21 एक्स-रे ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे व 4 एक्स-रे उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे काढण्यात आले.
        सदर शिबिर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.एस.एन तांबारे, जिल्हा हिवताप अधिकारी, डॉ.संजय पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीपकुमार जाधव, डॉ.श्रीनिवास मोरे व मदनसुरी प्रा.आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहा मुळजे, डॉ.शितल साळुंखे, डॉ.वाघमारे, प्रयोगशाळा पर्यवेक्षक परमेश्वर करपे, वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक एम.एस शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
           ग्रामीण रुग्णालय किल्लारीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सावनकुमार कडवकर यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. 
         सदर शिबिर यशस्वीतेसाठी आरोग्य कर्मचारी राहुल भोसले, जयपाल रुपनर, आरोग्यसेविका छाया जाधव, आशा स्वयंसेविका निर्मला कांबळे, लता कांबळे, उर्मिला पाटील व वाहनचालक प्रदीप माने यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या