Ticker

6/recent/ticker-posts

कृषीदिनी प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार

चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:- तालुकास्तरीय कृषी दिन १ जुलै रोजी पंचायत समिती साकोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती डॉ.ललित हेमने यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक गटविकास अधिकारी पी.पी. समरीत होते. या कृषी दिनाच्या निमित्ताने पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांचा शाल,श्रीफळ, कृषी संवादिनी व आंब्याचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळी युवा शेतकरी तथा पंचायत समिती सदस्य अनिल किरणापुरे,शेतकरी शास्त्रज्ञ मंच अध्यक्ष ताराचंद लंजे यांनी शेतीतील आपले अनुभव सांगितले.कार्यक्रमाप्रसंगी घनश्याम पारधी शेतीनिष्ठ शेतकरी उपस्थित होते. उपविभागीय कृषी अधिकारी साकोली किशोर पात्रीकर यांनी शेतकऱ्यांना फळबागेविषयी मार्गदर्शन केले व फळबाग लागवड करण्याचे आवाहन केले.तसेच कृषी विज्ञान केंद्र साकोलीचे प्रमोद पर्वते यांनी अलनिनोच्या परिस्थिती विषयी मार्गदर्शन करताना पेरीव धान पद्धतीचा वापर करणे, हलक्या प्रजातीचे धान लागवड करणे, रासायनिक खताचा कमी वापर करणे,पट्टा पद्धतीचा वापर करणे याविषयी मार्गदर्शन केले.  प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी आदित्य घोगरे यांनी केले.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कृषी अधिकारी पंचायत समिती साकोली सुरेंद्रकुमार झलके,कृषी विस्तार अधिकारी अनित्य,अशोक ब्राह्मणकर,कृषी विभागातील  पंकज जिभकाटे,भगीरथ सपाटे,घनश्याम लांबकाने व सहाय्यक कृषी अधिकारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या