Ticker

6/recent/ticker-posts

टेकाडी दिक्षीतमध्ये वाघाचा हल्ला

 शेतात चरत असलेल्या बैलाला ठार, शेतकऱ्याचे ₹1.20 लाखांचे नुकसान

 प्रतिनिधी : राजेश येसेकर 

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील टेकाडी दिक्षीत येथे बुधवारी दुपारी वाघाने हल्ला करून शेतात चरत असलेल्या एका बैलाला ठार मारले. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे ₹1.20 लाखांचे नुकसान झाले आहे.

ही घटना 29 जुलै रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. टेकाडी दिक्षीत येथील शेतकरी पंढरी शिवराम गायकवाड यांचे दोन बैल शेतात चरत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यातील एका बैलावर अचानक हल्ला केला.

गायकवाड यांनी आरडाओरडा केला असता वाघ त्यांच्यावर गुरगुरला. त्यानंतर गावकऱ्यांना बोलावून पुन्हा आरडाओरडा केल्यानंतर वाघ पळून गेला.

घटनेची माहिती मिळताच भद्रावती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत बैलाची किंमत ₹1.20 लाख असल्याचे सांगण्यात आले.

ऐन पेरणीच्या हंगामात बैल मृत्युमुखी पडल्याने पुढील शेती कशी करावी, असा प्रश्न गायकवाड यांच्यासमोर उभा राहिला आहे. याबाबत वनविभागाकडे तक्रार देण्यात आली असून तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्याने केली आहे. वनविभागाने या घटनेची नोंद घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

_______________________________
वाघाच्या हल्ल्यात बैल ठार, शेतकऱ्याचे नुकसान

टेकाडी दिक्षीत येथे शेतात चरत असलेल्या बैलावर वाघाने हल्ला करून त्याला ठार मारले. शेतकरी पंढरी गायकवाड यांचे ₹1.20 लाखांचे नुकसान. ऐन पेरणीच्या हंगामात हा प्रकार घडल्याने शेतीचा प्रश्न ऐरणीवर. वनविभागाने पंचनामा करून नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या