Ticker

6/recent/ticker-posts

ट्रॅक्टर सोडण्यासाठी ₹20 हजारांची लाच घेताना 3 वनकर्मचारी ACB च्या जाळ्यात

 भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयात धडक कारवाई

 प्रतिनिधी : राजेश येसेकर 

भद्रावती : जप्त केलेला ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी ₹20 हजारांची लाच मागत असताना भद्रावती वनपरिक्षेत्रातील 3 वनकर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई चंद्रपूर ACB च्या पथकाने भद्रावती येथील वनविभाग कार्यालयात केली.

ACB कडे तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाने एका ट्रॅक्टरवर कारवाई करून तो जप्त केला होता. तो सोडण्यासाठी क्षेत्र सहाय्यक कोमल गुगलोत आणि बीट वनरक्षक संदीप पारवे यांनी ₹20 हजारांची लाच मागितली होती.

तक्रारीची गोपनीय पडताळणी केल्यानंतर ACB ने सापळा रचला. त्यानुसार लाचेची रक्कम वनमजूर ललित नागपुरे याच्यामार्फत स्वीकारत असताना पथकाने तिघांनाही रंगेहात ताब्यात घेतले.

रंगेहात पकडलेले आरोपी कोमल गुगलोत - क्षेत्र सहाय्यक, भद्रावती वनपरिक्षेत्र संदीप पारवे - बीट वनरक्षक, भद्रावती वनपरिक्षेत्र, ललित नागपुरे - वनमजूर भद्रावती वनपरिक्षेत्र

या प्रकरणी तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास चंद्रपूर ACB करीत आहे.

या कारवाईमुळे वनविभागात खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत मिळाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या