चित्रा न्युज प्रतिनिधी
अमळनेर:- राशन पुरवठा मधील गोरगरीब नागरिकांना अत्यंत खराब राशन पुरवठा होत आहे, तरी राशन मधील अन्नधान्य हे मनुष्याला खाण्यालायक दिले जात नाही, तरी ते अन्नधान्य पशु पक्षीही खाऊ शकत नाहीत असं अन्नधान्य गोरगरीब जनतेला दया दाखवून दिले जात आहे, तरी हे अन्नधान्य आमच्या लेकरा बाळांना कशा पद्धतीने आम्ही खाऊ घालावं हा अमळनेर तालुका वाशीयांना पडलेला प्रश्न, पुरवठा अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी म्हणून राज्यभर मिरणाऱ्या स्वतःला गरिबांचे कैवारी समजणारे, आमदार, खासदार, माननीय मंत्री महोदयांनी, जनतेस सांगावे की जेणेकरून आम्ही ते अन्नधान्य शिजवून आमच्या लेकरा बाळांच्या ताटात आम्ही कुठल्या भरोशावर देऊ, एकदा वरिष्ठ अधिकारी यांनी खरोखर राशन पुरवठा मधील होणारा पुरवठा हा लेकरा बाळांना ताटात वाढून देण्या योग्य आहे का, हे तपासून पाहावं, प्रत्येक दुकानदाराकडे तुम्ही जाऊन अथवा तुमच्या गोडाऊन मध्यामातुन, रेशन दुकानामार्फत जनतेस मिळणाऱ्या, मका तांदूळ गहू मिळत असून तपासणी करावी, आणि तो माल खरोखर खाण्या योग्य असेल तरच तुम्ही वितरण करावा, अन्यथा वितरण करू नये, एकीकडे एफडीआय वरती तुकाराम मुंडे साहेब चांगल्या प्रकारे यंत्रणा राबवून राज्य सुदृढ तसेच गोरगरिब असो या श्रीमंत सर्वांनाच चांगल्या प्रकारे सुविधा मिळावी अन्नधान्य मिळावं, यासाठी झटत आहात, उत्तमरीत्या सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करत आहात, दुसरीकडे आमचं शासन, प्रशासन, बेजबाबदार व्यवस्थेतून गोरगरीब जनतेला वेठीस धरून जे धान्य पशु पक्षी खाऊ शकत नाही, असं राशन मध्ये मिळणार धान्य आपण मनुष्यबळावर वापर करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे.. एकदा खरोखर आमदार, खासदार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच मंत्री महोदयांनी ते अन्नधान्य आपल्या स्वतःच्या परिवारासहित वापरून बघावं? आपल्या परिवाराच्या ताटात सुद्धा ते अन्नधान्य टाकावं? आणि ते मेजवानी म्हणून आपण स्वीकार कराव, तेव्हा मंत्री महोदय व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळेल की जेणेकरून गोरगरीब लोक हे अन्न कसं ग्रहण करत असतील, परंतु आम्ही, वदने कवळ घेता, नाम घ्यावे श्रीहरीचे, अन्न हे पूर्ण परब्रम्ह आहे, सहज खाता हवन होते, ह्या हिशोबाने आम्ही अन्नग्रहण करीत असतो, त्यामुळे गरीब जनता तरी देखील सुजलाम सुफलाम होते, असं म्हणून आम्ही प्रत्येक गोरगरीब नागरिक पुढे चालत असतो, यावर शासनाने व लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर चांगल्या प्रकारे अन्नधान्याचा पुरवठा होण्यासाठी निर्णय घ्यावा.. पुरवठा गोदामांकडे लक्ष द्यावं.. आणि आलेला रेशन मधील माल त्वरित चेक करून तो योग्य आहे की नाही. तो तपासूनच वितरित करावा. तेव्हाच जनता जनार्दन तो राशन मध्ये मिळणारा पुरवठा घेऊन आपलं घर समाधानी करू शकतील. अन्यथा गोरगरीब जनता उपवासिच राहील... संतोष पाटील प्रहार संघटना तालुका अध्यक्ष अमळनेर..8999859021


0 टिप्पण्या