Ticker

6/recent/ticker-posts

इनरव्हील क्लब भद्रावतीतर्फे चिमुकल्या कलाकारांचा उत्साहवर्धन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : इनरव्हील क्लब भद्रावतीतर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०२६ रोजी किल्ला वॉर्ड, विठ्ठल मंदिर परिसरातील ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री-प्रायमरी स्कूल येथे शाळा भेटीचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा व नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारत तसेच नृत्याच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचे सुंदर सादरीकरण केले. इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांचा उत्साह वाढविला.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून क्लबच्या सदस्यांनी पांढरा पोशाख व तिरंगा चुनरी परिधान करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, आत्मविश्वासाला आणि कलागुणांना प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थित पदाधिकारी व सदस्य
अध्यक्षा : सौ. मनीषा ढोमणे ,सचिव : सौ. रश्मी बिसेन
कोषाध्यक्ष : सौ. पूजा महाजन,ISO : सौ. निरुपा भालोडिया,संपादिका : सौ.हेमलता ठिकरे
माजी अध्यक्षा २०२४–२५ :सौ. प्रेमा पोटदुखे
कार्यकारी समिती अधिकारी : डॉ. माला प्रेमचंद, ई-अॅडमिन : सौ. वंदना धनोरकर,सौ.रुखसाना शेख
सौ. रेखा शेवाळे,सौ.सिमI पवार,सौ. ज्योती वैद्य
सौ. अश्विनी लेडांगे,सौ. गौरी वैद्ये,सौ. वर्षा पढाल
सौ. विभा बहिरे,सौ. निलिमा वाढरे,सौ.ममता सIरडा
सौ.मेघा शेंढे,सौ. केशवनी हटवार,सौ. विभा बहिरे
सौ. रिता मुंडे,शाळेच्या शिक्षिका,सौ. श्वेता खुतेमाटे
सौ. तनुजा पाचभाई,शाळेच्या शिक्षिकांनी विद्यार्थ्यांच्या फॅन्सी ड्रेस व नृत्य कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला.
चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य आणि त्यांच्या कलागुणांना मिळालेली दाद यामुळे हा स्वातंत्र्यदिनाचा उपक्रम संस्मरणीय ठरला.
— इनरव्हील क्लब भद्रावती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या