Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर अरुण मेश्राम यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फिलोशीप पुरस्कार जाहीर.

 चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर  : रामटेक तालुक्यातील पिंडका पार येथील दंडारीचे सुप्रसिद्ध शाहीर तथा महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे विदर्भ उपप्रमुख शाहीर अरुण सोमाजी मेश्राम यांची भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फिलोशीप अवार्ड -2026 साठी निवड करण्यात आली आहे. अकादमीने पाठवलेल्या पत्रानुसार या वर्षाचा प्रतिष्ठेच्या पुरस्कार दिनांक 12 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय दलित साहित्य अकादमी विविध क्षेत्रातील साहित्यिक सामाजिक, पत्रकार, समाजसेवक,कलाक्षेत्रातील, आणि मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल दरवर्षी सन्मानित करते. या निवडीबद्दल शाहीर अरुण मेश्राम  यांच्यावर विविध स्तरावरून अभिनंदनचा वर्षाव होत असून सामाजिक तसेच कलाक्षेत्रातील त्यांनी केलेल्या कार्याची ही दखल असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल महाराष्ट्रातील अनेक कलावंत त्यांचे अभिनंदन करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या