चित्रा न्युज प्रतिनिधी
हिंगोली :-डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक महाराष्ट्र रत्नागिरी भारत रजि. शाखा जिल्हा नाशिक यांच्या वतीने दि. 28 ते 30 जुलै 2026 दरम्यान विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध या विषयावर राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून नामवंत साहित्यिक व कवींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती यावेळी समता बंधुता करुणा मैत्री प्रज्ञा आणि न्यायाचा संदेश या साहित्यिक लेखक कवी यांनी बुद्धाच्या विचाराचा वारसा समाजासमोर पोहचविण्याचा या स्पर्धेतेचा उद्देश होता या स्पर्धेत कविता लेख लेखन अभंग आदि साहित्यप्रकारांतून उत्कृष्ट साहित्यनिर्मिती करणाऱ्या साहित्यिक व कवी यांचा गौरव करण्यात आला या राज्यस्तरीय स्पर्धेत पुर्णा येथील कवी उमेश बाऱ्हाटे यांनी सादर केलेल्या काव्यलेखनाला तिसरा क्रमांक मिळाला या उल्लेखनीय साहित्यिक कामगिरीबद्दल त्यांना राज्यस्तरीय विश्वगुरु पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामुळे पुर्णा जिल्हा परभणी येथील कवी उमेश बाऱ्हाटे यांचा परीसरातील साहित्यप्रेमी आणि काव्यरसिकांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे


0 टिप्पण्या