Ticker

6/recent/ticker-posts

ट्रॅक्टरच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू

नागपूर रोडवर भीषण अपघात

 
प्रतिनधी : राजेश येसेकर

चंद्रपूर : मुल - नागपूर रोडवरील लक्ष्मीनारायण राईस मिलसमोर गुरुवारी सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. या घटने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

बाजार आटोपून दुचाकीने आपल्या बोंडाळा (भूज) या स्वगावी परत जात असताना समोरून भरधाव आलेल्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांनाही गंभीर दुखापत होऊन जागीच प्राण गेले.

अपघातात  मृत्य पडलेले राहुल नारायण पाल - वय 35 वर्षे व ईशा राहुल पाल - वय 3 वर्षे, चिमुकली मुलगी

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल पाल हे मुलीसह बाजारासाठी आले होते. बाजार आटोपल्यानंतर ते घरी परत असताना हा अपघात घडला.

अपघाताची माहिती मिळताच मुल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, मुल येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनीही रुग्णालयाकडे धाव घेतली.

एका क्षणात बाप-लेकीची जोडी हिरावल्याने पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या