Ticker

6/recent/ticker-posts

जि. प. प्राथमिक शाळा पोहरा येथे तीन दिवस उत्साहात ध्वजारोहण;

माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वज फडकवून रचला नवा अध्याय

चित्रा न्युज प्रतिनिधी 
पोहरा: 'हर घर तिरंगा' उपक्रमा अंतर्गत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १३, १४ आणि १५ ऑगस्ट रोजी अत्यंत उत्साही व देशभक्तीपर वातावरणात तीन दिवसीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची नवी आणि स्तुत्य परंपरा सुरू करून यावर्षी कार्यक्रमात एक नवा अध्याय रचला गेला.
          उपक्रमाच्या पहिल्या दिवशी, १३ ऑगस्ट रोजी शाळेचे माजी विद्यार्थी तथा पोहरा गावचे माजी सरपंच देविदास गिऱ्हेपुंजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश मोटघरे उपस्थित होते.
        दुसऱ्या दिवशी, १४ ऑगस्ट रोजी माजी विद्यार्थिनी तथा सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती साधनाताई राजेंद्र हटनागर यांच्या शुभहस्ते ध्वज फडकवण्यात आला. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रणय सहदेवकर यांची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर शाळा परिसरात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.
         १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी माजी वैद्यकीय अधिकारी व माजी विद्यार्थी डॉ. दिलीप अंबादे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण पार पडले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या विद्या कुंभरे होत्या
         ध्वजारोहणानंतर डॉ. दिलीप अंबादे यांचा शिक्षण क्षेत्रातील व समाजसेवेतील योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
         सोहळ्यानंतर गावात भव्य प्रभातफेरी काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण पोहरा गावात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि आपल्या कलागुणांचे सादरकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
            या तीन दिवसीय उत्सवाला सरपंच रामलाल पाटणकर, मुख्याध्यापक बोपचे, सहा. अध्यापक प्रकाश हेडाऊ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश मोटघरे, माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष प्रणय सहदेवकर, युवराज सलामे, फारुख छव्वारे,पद्माकर भस्मे, गायत्री मांढरे, उमा गभने, उर्मिला बोडणकर, प्रवीण अंबादे, गौरव कछवे,दिनेश मासुरकर, मंगेश भस्मे, निलेश वालोदे, पवन वंजारी, सुशील गभने, भारत चांदेवार, प्रकाश दुर्गे, रामूदा अंबादे, लोकेश गायधणे, रोशन मांढरे, हेमंत बडवाईक, अंगणवाडी सेविका, पोहरा गावातील ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या