Ticker

6/recent/ticker-posts

भद्रवतीत एरोबिक्स कॅम्प राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड

आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा जिम्नस्टिक कॅम्प 14 पासून

प्रतिनिधी : राजेश येसेकर

 चंद्रपूर : आयुषी स्पोर्ट्स अकॅडमी, चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्हा अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 09 वा जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक्स कॅम्प – एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स आयोजित करण्यात आला आहे. 

हा कॅम्प दि. 14, 15 व 16 ऑगस्ट 2026 रोजी तालुका क्रीडा संकुल, भद्रावती, चंद्रपूर येथे होणार आहे.या कॅम्पचा प्रमुख उद्देश सप्टेंबर 2026 मध्ये शेगाव येथे होणाऱ्या मान्यताप्राप्त 26 व्या राज्यस्तरीय एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्हा संघाची निवड करणे हा आहे. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन मिळावे यासाठी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाणार आहे.

 अमेया जोशी - इंटरनॅशनल एक्स्पर्ट रेफरी अँड कोच – FIG, GFI & MAGA, छत्रपती संभाजीनगर, हर्षल मोगरे - इंटरनॅशनल एक्स्पर्ट रेफरी अँड कोच – FIG, GFI & MAGA, छत्रपती संभाजीनगर, गौरव जोगदंड - श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन्मानित, राज्य क्रीडा मार्गदर्शक – जिम्नॅस्टिक्स, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर,सिद्धार्थ कदम - श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन्मानित, राज्य क्रीडा मार्गदर्शक – जिम्नॅस्टिक्स, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना

या चारही तज्ज्ञांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. संजय शेटे  - अध्यक्ष, MAGA मुंबई | सचिव, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन डॉ. मकरंद जोशी - सचिव, MAGA, छत्रपती संभाजीनगर

दुर्गराज नारायण रामटेके
Executive Member आणि Judge - MAGA | संस्थापक - CDAGA | मुख्य कोच - आयुषी स्पोर्ट्स अकॅडमी, चंद्रपूर  
यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हा कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.

या कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा असोसिएशनच्या अध्यक्षा सौ. शीतल रामटेके, निलेश गुंडावार, ॲड. राजरत्न पथाडे, आशुतोष गायनेवार, अशोक कामडे, संजय माटे, करण डोंगरे, बी. एल. करमणकर, आयुषी रामटेके, राकेश राय, ज्ञानेश्वर जुमडे, गणेश राठोड, दीक्षांत रामटेके, सागर मामीडवार, डेव्हिड नार्सिस, संदीप पांढरे, गौतम भगत, पूनम चव्हाण, कुणाल आत्राम तसेच आयुषी स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व प्रशिक्षक सहकार्य करणार आहेत.

या कॅम्पमधून चंद्रपूर जिल्ह्यातील एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स खेळाडूंना उच्च दर्जाचे तांत्रिक प्रशिक्षण, स्पर्धात्मक अनुभव आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गुणवत्ता सिद्ध करण्याची महत्वपूर्ण संधी मिळणार आहे.

संपर्क : 9067758618

— *आयोजक* —  
आयुषी स्पोर्ट्स अकॅडमी, चंद्रपूर  
चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर जिमनास्टिक्स असोसिएशन

***************************
भद्रावतीत 14 ते 16 ऑगस्टला एरोबिक्स जिम्नॅस्टिक्स कॅम्प

आयुषी स्पोर्ट्स अकॅडमी व जिल्हा जिम्नॅस्टिक्स असोसिएशन आयोजित. शेगाव येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड. FIG चे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अमेया जोशी, हर्षल मोगरे यांचे मार्गदर्शन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या