Ticker

6/recent/ticker-posts

तडेगांव जिल्हापरिषद शाळेत चार ते पाच वर्षापासुन दोन शिक्षकांच्या जागा रिक्त विद्यार्थ्यांचे होत आहे नुकसान


मनिष मसुरकर उपसंपादक चित्रा न्युज
मो.नं. :८८७९३७३१६४

जालना : भोकरदन तालुक्यातील मौजे तडेगांव जिल्हापरिषद प्राथमिक शाळा केंद्र (बरंजळा सा.) 
या शाळेत वर्ग 1ते 8 पर्यंत 312 विद्यार्थी संख्या असुन सद्य स्थितीत सात शिक्षक कार्यरत आहे.परंतु चार ते पाच वर्षापासुन या ठिकाणी दोन शिक्षकांच्या जागा रिक्त आहे.यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गावकर्यांच्या व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने गटशिक्षणाधीकारी  श्री.मुळे साहेब पंचायत समिती कार्यालय भोकरदन जि.जालना यांना दिनांक 01/07/2022 रोजी निवेदन देण्यात आले. परंतु आज पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात का होईना व्यवस्था झालेली नाही. तरी याबाबत लवकरात  लवकर दखल घेवुन शिक्षक देण्याची विनंती करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देतांना शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर गोफणे,उपसरपंच वसिम शेख,उपाध्यक्ष असद शेख,पत्रकार शरद साळवे,सामाजिक कार्यकर्ते सलिम शेख इत्यादी उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या