Ticker

6/recent/ticker-posts

चिकन - मडईत घाणीचे साम्राज्य


मुनिश्चर बोरकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली ...

गडचिरोली :- गडचिरोली शहरात चिकन व बकरा कटाईचे दुकाने तलावाच्या जवळच आहेत . तलावाच्या पाळीवर पन्न्या व कचरा ढेरसारा जमा झालेला असून एक प्रकारचा डंपर झोन निर्माण झालेला आहे. त्यामुळे गोकुळ नगर ला आवागमन करणाऱ्या पादचारी ना नाक दाबुनच जावे लागते . सदर घाणीच्या साम्राज्यामुळे दुर्गधी सुटल्यामुळे जनु रोगाला आमंत्रण देणे होय . पावसाळ्यात साथीच्या रोगामुळे . ताप, डायरिया, कंबरदुखी चे जास्त पेशन्ट असून यामध्ये घाणीच्या साम्राज्याची भर तसेच लागूनच बांधलेला मुत्री व संडास घर घाणेरडा असुन त्या ठिकानी लघुसंकेसाठी व संडासला कुणीही जात नाही . नगर परिषदेचे डम्पर झोन खंरपुडी रोड लगत आहे . नगर परिषदेने सदर कचरा त्या ठिकाणी नेवून टाकावा व मुत्री घराची सफाई कर्मचाऱ्या मार्फत करावी . व नागरिकांना रोग मुक्त वापरु घ्यावा अशी मागणी नागरिका कइन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या