Ticker

6/recent/ticker-posts

अती वृष्टी मुळे अंगावर घर कोसळून मृत्यू झालेल्या राम कातकरी याच्या कुटुंबियाला महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकरांनी केली आर्थिक मदत.

विठ्ठल ममताबादे तालुका प्रतिनिधी उरण, जिल्हा रायगड 

उरण (रायगड ):-जांभूळ पाडा कातकरी वाडी, उरण, जिल्हा रायगड येथील राम कातकरी याचा अती वृष्टी मुळे अंगावर घर कोसळून मृत्यु झाला  आणि त्याच्या बायकोला हाता पायाला दुखापत झाल्याचे समजताच सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांनी कातकरी कुटुंबियांना मदतीचा हात दिला असून सामाजिक बांधिलकी जपत दहा हजाराची मदत राजू मुंबईकर यांनी सुमन राम कातकरी यांच्या हातात सुपूर्द केली.


 दिनांक 11/7/2022 रोजी उरण तालुक्यात जोरात, मुसळधार पाऊस पडत होता. वादळवाराही जोरात सुरु होता. त्यातच रात्री 2 वाजता आदिवासी वाडीतील घर कोसळून राम कातकरी याचा मृत्यू झाला आहे.4 मुले, आई वडील व नवरा बायको असा त्यांचा कुटुंब आहे.लाकडे गोळा करून तसेच मोल मजुरी करून हे कुटुंब जगत होते. या पीडित कुटुंबाला मदत करून राजू मुंबईकरांनी त्यांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांचे सांत्वन केले.अत्यंत हालाखीत, वाईट परिस्थितीत जगणाऱ्या या  पीडित कुटुंबाला शासकीय मदतनिधी मिळावी अशी अपेक्षा महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांनी व्यक्त केली आहे.समाजातील दानशूर व्यक्तींनीही पुढे येऊन पीडित कुटुंबास मदत करावे असे नम्र आवाहन राजू मुंबईकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या