Ticker

6/recent/ticker-posts

अनावश्यक खर्चाला फाटा देत बच्चु भाऊ कडू आणि प्रहार शेतकरी संघटना जिल्हा समन्वयक पंडित साळुंके , लखन मोरे यांचा वाढदिवस वृद्धाश्रम परिसरात वृक्षारोपण करत आणि वृद्धांना केळी आणि फळे वाटप करून विविध उपक्रमांनी साजरा


सोमनाथ खंडागळे जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण सोलापूर 

सोलापूर  :-उपळाई बु .येथे स्पर्श बहुदेशिय संस्थेमार्फत 'आधार वृद्धाश्रम ' वडाची वाडी- उपळाई बु// या ठिकाणी चालविण्यात येत असलेल्या वृद्धाश्रम येथे मा.ना. बच्चू भाऊ कडू आणि प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके , लखन मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व आश्रमातील वृध्दांना केळी आणि फळे वाटप समाज कल्याण आयुक्त आमचे मार्गदर्शक सचिन जी कवले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. प्रहार शेतकरी संघटना माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे आणि आमचे जिगरी मित्र किरण जी गुरव यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  त्यावेळेस उपस्थित डॉ . माळी साहेब, कृष्णा आपा कवले, आपचे जिल्हा अध्यक्ष संतोष जी कवले, रामचंद्र कवले, विशाल काळे उपस्थित होते.कार्यक्रम प्रहार शेतकरी संघटनेचे आणि टायगर ग्रुप मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या