Ticker

6/recent/ticker-posts

26 नोव्हेंबर संविधान दिनी बिलोली येथे संविधान दिंडीचे आयोजन

चंद्रशेखर वाघमारे (पपु निवळीकर) संपादक महा चित्रा न्युज मो. ८८८८११७९७५

नांदेड -: दि.26 नोव्हेंबर 2022 वार- शनिवार रोजी बिलोली येथे "संविधान जागृती समिती" च्या वतीने संविधान दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
या संविधान दिंडीमध्ये बिलोली येथील सर्व शाळांचे विद्यार्थी, शिक्षक सहभागी होणार आहेत.
या संविधान दिंडीची सुरुवात सकाळी 10 वाजता "पूज्य सानेगुरुजी हायस्कुल बिलोली" येथून सुरू होऊन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप होणार आहे.
या दिंडीच्या समारोपाच्या कार्यक्रमास मा.तहसीलदार साहेब बिलोली, मा.बी.डी.ओ साहेब बिलोली, मा.शिक्षणाधिकारी साहेब बिलोली
यांची प्रमुख उपास्थिती असणार आहेत.
तेंव्हा बिलोली तालुक्यातील सर्व स्थरातील सर्वच सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार तसेच सर्व संविधान प्रेमी सुजाण नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन, गौतम भालेराव, धम्मानंद सोनकांबळे, नागसेन जिगळेकर, कमलाकर जमदाडे, किरण सोनकांबळे, शेषेराव जेठे, प्रदीप वाघमारे, सिद्धार्थ सोनकांबळे,शंकर गायकवाड,गौतम कांबळे, प्रमोद फकिरे, केशव पवार, सुरेश कुडकेकर, नागनाथ मनुरे, जेठे शंकर, मोहन जाधव, सुनील कांबळे, बालाजी एलगंद्रे, मुकीनंदर कुडके, संदीप कटारे, बाळासाहेब लाखे, कुणाल सोनकांबळे, चक्रधर टेकाळे पाटील, यांनी केले आहे.
संविधान जागृती समिती बिलोली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या