नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ची मागणी
रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
भंडारा :- लाखनी तालुक्यातील रेंगेपार/कोहळी शेतशिवारात ठेवलेले मळणी केलेले धानाचे पोते आणि धानाच्या पुजण्याची हत्तीच्या कळपाने नासधूस केल्याची घटना बुधवारी(ता.३०) सकाळचे सुमारास उघडकीस आली. या प्रकाराने ९ शेतकऱ्यांचे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे. वन व महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय लाखनी आणि साकोली चे सीमेवर असलेल्या सहवन क्षेत्र जांभळी, वनरक्षक बीट बरडकिन्ही आणि परिसरात मागील दोन दिवसापासून जंगली हत्तीच्या कळपाचा हैदोष सुरू असून या प्रकाराने वनक्षेत्रालगत गावातील नागरिक भयभीत झाले असून या हत्तीच्या कळपाकडून शेतातील धान अथवा ऊस वाड्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले जात आहे. तसेच वन क्षेत्रातील झाडाच्या फांद्यांचीही प्रचंड प्रमाणात नुकसान केली जात आहे. सदर हत्तीचा कळपाचे लोकेशन मंगळवारी रात्रीचे सुमारास मोहघाटा, बरडकिन्ही येथे असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. हा कळप मंगळवारी रात्रीचे सुमारास मुंडीपार/सडक, पिंपळगाव/टोली जंगल मार्गे रेंगेपार/कोहळी शेतशिवारात शिरून नीलकंठ जीवतोडे, हरिश्चंद्र मांढरे, पद्माकर शिवणकर, गोपीचंद मांढरे, अनिल मांढरे, केवळराम, मांढरे, रवी मांढरे, कमला मांढरे यांचे धानाच्या पूजण्याचे नुकसान केले तर दिलीप कापगते यांचे मळणी केलेले खळ्यावर पोत्यात भरून ठेवलेले धान हत्तीच्या कळपाने फस्त करून नुकसान केले आहे. गावालगत हत्ती आल्याने गावकरी भयभीत झाले असून उपाययोजना करण्याचे आवाहन गावकऱ्यांनी केले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी होत आहे.


0 टिप्पण्या