Ticker

6/recent/ticker-posts

महोगनी वृक्ष लागवड काळाची गरजऔषधासह जहाज बांधणीसाठी होतो उपयोग

लाखनी तालुक्यात ७३ एकर क्षेत्रात लागवड होणार 


रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

 भंडारा :- महोनगी वृक्ष लागवडीमुळे जमनितील सेंद्रीय खताचे योग्य व्यवस्थापन होत असल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. तसेच ही वनस्पती वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेते. त्यामुळे हवा शुद्ध होते. तसेच बियांचा उपयोग कर्करोग, क्षय, मलेरिया, अँनीमिया, मधुमेह इत्यादी आजाराच्या औषधामध्ये होतो. तर लाकूड जहाज बांधणीसाठी वापरण्यात येते. त्यामुळे महोगनी लागवडीमुळे पर्यावरण रक्षणासह शेतकऱ्यास आर्थिक उन्नती होत असल्याची माहिती मिळताच लाखनी तालुक्यात १९ गावातील ७३ एकर क्षेत्रात महोगनी वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. 
         मोहगनी हे बहुउपयोगी वृक्ष असून या वृक्षाची लागवड केल्यानंतर शेतकऱ्याला एक झाड १२ वर्षानंतर उत्पन्न मिळवुन देते. १२ वर्षात हे झाड सुमारे ३५ ते ४० फूट सरळ वाढते. याच्या वाढीसाठी नैसर्गिक किंवा सेंद्रिय खताची आवश्यकता असते. या वृक्षाला परिपूर्ण होण्यासाठी १० ते १२ वर्ष लागतात. १२ ते ४८ अंश सेल्सिअस तापमानात हे झाड जगू शकते. त्यानंतर ७०० ते २००० मिमी पावसात सुध्दा झाड जगते. १२ वर्षात १ मीटर पर्यत खोडाच्या परिघाची वाढ होते. कठीण लाकूड असून यावर पाणी किंवा किड्यांचा परिणाम होत नाही. महोगनी पासून संगीत वाद्य, कागद, नक्षीदार तावदान, आतील ट्रिम, फर्निचर यासाठी उपयोग केला जातो. याशिवाय फळे, पाने आणि फांद्यांचे अर्क हे औषधीसाठी उपयोग येत असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठया प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामुळे महोगनी वृक्षाची लागवड शेतकऱ्यांना अतिशय किफायतशीर ठरणार आहे. यातून पर्यावरणासह शेतकऱ्यांचा आर्थिक विकासास मदत होणार आहे. या शिवाय जागतिक तापमान वाढ कमी होण्यास मदत, पर्जन्यमान सुधारणा तर पूर्व दुष्काळ नियंत्रणास अप्रत्यक्षरीत्या महोगनी वृक्ष लागवड वर्दान ठरते. पक्षी व फुलपाखरे तथा मधमाश्यांच्या नैसर्गिक अधिवासास महोगनीमुळे अनुकूलता येते. या बाबद महोगनी विश्व ॲग्रो चे वसंत तीतिरमारे, प्रवीण हेडाऊ यांनी तालुक्यासह जिल्ह्यात जनजागरण केल्यामुळे लाखनी तालुक्यात डोंगरगाव/न्याहरवाणी, कनेरी, पेंढरी, गोंडेगाव, गुरढा, कन्हाळगाव, जेवनाळा, मचारणा, मुरमाडी/तूप, सेलोटी, केसलवाडा/वाघ, मुरमाडी/सावरी, गराडा, शिवणी, पोहरा, धाबेटेकडी, घोडेझरी, खराशी, नरव्हा इत्यादी १९ गावातील ७३ एकर जागेत महोगनी वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. या करिता महोगाणी विश्व ॲग्रो कडून रोपे उपलब्ध केले जाणार आहे. 
*अशी करावी रोपांची लागवड(चौकट)*
एक एकर क्षेत्रासाठी चौकोनी पद्धतीने ४४४ रोपे लागतात. २ रोपांतील अंतर दहा बाय दहा फूट असावे. या करिता खड्ड्यांची लांबी व रुंदी एक ते दीड फूट असावी. वृक्ष लागवडी पासून ७ वर्षापर्यंत आंतरपीक घेता येते. अशा पद्धतीने महोगनी वृक्ष लागवड करावी लागते. 
*शासनाकडून महोगनी लागवडीस प्राधान्य(चौकट)* 
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत महोगनी वृक्ष लागवडीस शासनाकडून मंजूरीस्तव परवानगी देण्यात आलेली आहे. तांत्रिक मान्यतेचे अधिकार पंचायत समितीचे कृषी अधिकारी तर प्रशासकीय मान्यतेचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या