रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
चंद्रपूर :-आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोज शनिवारला चिमुर तालुक्यातील बौद्ध पंचकामिटी शंकरपुरच्या वतीने ७३वा भारतीय संविधान दिवस बौद्ध पंचकमेटी शंकरपुरचे अध्यक्षा व ग्रा . पं.सदस्य श्रीमती येशवकला अविनाश ढोक यांच्या अध्यक्षतेखाली व सौ शारदा राहुल गायकवाड ग्रा. पं. सदस्या शंकरपुर यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून भारतीय संविधान प्रस्तविकेचे वाचन करून भारतीय संविधान दिवस संपन्न करण्यात आला. या प्रसंगी
येश्वकला ताई ढोक यांनी देशाला एक सुत्रात बाधण्याचे काम संविधानाने केले असुन आज देशाला हुकमशाही कडे ढकलण्यात येत आहे ज्यामुळे देश अधोगती कडे जाईल त्यामुळे आज संविधान वाचविण्याची वेळ आली आहे असे मत व्यक्त केले यावेळी बौद्ध पंचकमिटी शंकरपुरचे सचिव मंदाकीनी मेश्राम बौद्ध उपासक, उपसिका आणि शंकरपुर वासिय नागरिक उपस्थित होते.


0 टिप्पण्या