Ticker

6/recent/ticker-posts

अचानक लागलेल्या आगीमध्ये धानाचे पुंजने जळून खाक

धम्मदिप साखरे,लाखांदूर तालुका प्रतिनिधी,मो. नं.8698390104


लाखांदूर:- तालुक्यातील दिघोरी मोठी या गावातील गणेश जयराम वालदे यांच्या शेतामध्ये असलेल्या धानाच्या पुंजण्याला अज्ञात व्क्तीने लावलेल्या आगीमुळे धानाचे पुंजने जळून खाक झाले आहे, या घटनेमुळे 70,000हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
       
ही घटना 25 तारखेला रात्रीला घडलेली आहे, आणि माहिती झाली 26 तारखेला. या धानाच्या पुंजण्याला नेमकी आग कशामुळे लागली, कोणी लावली याचा अंदाज अजून उघडीस आलेला नाही. गणेश जयराम वालदे यांचा आजच्या बाजार भावानुसार अंदाजे 70,000हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 
   देशाचा पोशिंदा शेतकरी आणि ऐन वेळेवर सर्व खर्च करून तोंडाजवळ आलेला घास या नियतीने हिरावून घेतल्याने शेतकरी हा चिंतित झालेला आहे व त्यामुळे त्याच्या डोक्यावर आणखी कर्जाची वाढ झालेली आहे, सदर शेतकऱ्याने बँकेतून तसेच पतसंस्थेमधून कर्ज घेतले होते आता ते फेडावे कसे या विवंचनेत सदर शेतकरी आलेला आहे.
   घडलेली घटना गांभीर्याने घेऊन शासनाने आर्थिक सहाय्य करावे अशी गावकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या