Ticker

6/recent/ticker-posts

अँकर - बॉबी ग्रुपच्या वतीने आयोजित संविधान वाचन कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणीने महिलांना अश्रू अनावर झाले



मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो , 9860179256

सोलापूर :- दिनांक 26 नोव्हेंबरबॉबी ग्रुपच्या वतीने बॉबी चौक येथे संविधान वाचन दिनानिमित्त संविधान वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी अजित गायकवाड, नगरसेविका वंदना गायकवाड, सुशील सरवदे, श्रीकांत बनसोडे, सिद्धार्थ मागाडे, अशोक सवाईसर्जे, गोरखनाथ लोंढे, राहुल लोखंडे, दत्ता शिवशरण, सुधाकर सोनवणे, अमोल धेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,व बुद्धवंदना घेण्यात आली, त्यानंतर सामूहिक संविधान वाचन घेण्यात आले

यावेळी मान्यवरांची भाषणे देखील झाली, परंतु नगरसेविका वंदना गायकवाड ह्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी आणि त्यांनी केलेला संघर्ष सांगायला सुरुवात केली त्यावेळी मात्र अनेक महिला बाबासाहेबांच्या आठवणीने भावुक झाल्या होत्या तर काही महिलांना अश्रू देखील अनावर झाले होते, 

दरम्यान या कार्यक्रमाबत अजित गायकवाड यांनी अधिक माहिती दिली

यावेळी मंडळाचे कार्यकर्ते प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या