Ticker

6/recent/ticker-posts

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया आजपासून



कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :-लाखनी तालुक्यात नोव्हेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कार्यक्रम सोमवार ता.२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत होणार आहे. ५१ ग्रामपंचायतीच्या १६० प्रभागातून ४१३ सदस्यांची निवड होणार असून त्यात २३२ महिला सदस्यांचा समावेश असून अनुसूचित जातीची ८२, अनुसूचित जमातीचे २१, नागरिकांचा मागास प्रवर्ग(ओबीसी) ५८ तर सर्वसाधारण गटातून २५२ ग्रामपंचायत सदस्य निवडून येणार आहेत. त्यांपैकी ४७,१४,४१ आणि १३० महिला सदस्य निवडून येणार आहेत. अनुसूचित जाती ९, अनुसूचित जमाती ४, नागरिकांचा मागास प्रवर्ग(ओबीसी) १३ आणि सर्वसाधारण २५ असे सरपंचासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी अनुसूचित जाती ६, अनुसूचित जमाती १, ना. मा. प्र. ६ व सर्वसाधारण १४ अशा २७ ग्रामपंचायतीत महिला राज येणार आहे. सरपंचाची निवडणूक गावातून होणार आहे. तालुका प्रशासनाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची ग्रामपंचायत निहाय नेमणूक केली असून तहसील कार्यालयात नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. ५ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज छाननी, ७ डिसेंबर आणि त्याच दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येतील. तसेच १८ डिसेंबर रोजी मतदान व २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 
*असे आहेत ग्रामपंचायत निहाय निवडणूक निर्णय अधिकारी(चौकट)*
पी.आर. हुमने - गराडा, केसलवाडा/वाघ
आय.एस. भांडारकर - गडेगाव, गोंडसावरी
एस.आर. तीरसागडे - मासलमेटा, केसलवाडा/पवार, सालेभाटा
एस.पी. वरकडे - आलेसुर, बोरगाव, लाखोरी
अरुण देव्हारे - पिंपळगाव/सडक, सामेवाडा
राधेश्याम इंगोले - राजेगाव, मोरगाव, नीलागोंदी
के.एन. चव्हाण - मुरमाडी/सावरी, सावरी
डी. ए. लंजे - सेलोटी, धानला, मानेगाव 
अनिल भाकरे - कोलारी, कन्हाळगाव, पळसगाव
जयभीम पाटील - भूगाव, मेंढा/टोली, विहिरगाव/कन्हा.
आर.आर. कोळी - कनेरी/दगडी, पेंढरी, डोंगरगाव/न्या.
एम. डी. केवट - मुरमाडी/तूप, मिरेगाव
डी. यू. मलोडे - मोगरा, दिघोरी/लहान 
ए.के. शहारे - वाकल, मरेगाव, पाथरी
ए.पी. जीभकाटे - जेवनाळा, पालांदूर/चौरास, कौलेवाडा 
जी.एन. गाढवे - गुरढा, गोंडेगाव, निमगाव 
व्ही.एच. मेश्राम - घोडेझरी, खूनारी, खराशी 
जी.एस. शेंडे - मचारणा, मांगली, इसापुर
एम.एन. खराबे - किटाडी, देवरी, गोंदी
*उमेदवारांना लागणारे महत्वाचे कागदपत्र(चौकट)*
मालमत्ता व दायित्व प्रमाणपत्र, गुन्हेगारी पार्श्वूभूमी असल्या बाबदचे स्वयंघोषणा पत्र, शौचालय असल्या बाबदचे स्वयंघोषणा पत्र, घर टॅक्स/थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र(ग्रामसेवक) , ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, अपत्या संबंधी स्वयं घोषणा पत्र आणि उमेदवाराचे बँक खाते पासबुक इत्यादी कागदपत्रे नामनिर्देशन पत्रासोबत आवश्यक आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या