कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :- वनसंवर्धन आणि संरक्षणाकरिता शासन प्रयत्नशील असून अनेक योजनांचे माध्यमातून आवश्यक तो निधीही उपलब्ध केला जातो. पण "कुंपणच शेत खाते" या प्रमाणे शासनाची उद्देशपूर्ती होत नाही. याचा प्रत्यय वनरक्षक बीट रामपुरी येथे आला. स्थानिक वन कर्मचारी व तस्करातील अर्थपूर्ण संबंधामुळे अवैध वृक्षतोड व वाहतूक सुरू असल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी लाखनी चे अधिनस्त येणाऱ्या वनरक्षक बीट रामपुरी येथे दिघोरी, नांन्होरी, मोगरा, शिवणी, धाबेटेकडी, चीचटोला, कन्हाळगाव व रामपुरी या गावांचा समावेश होतो. पुरातन व मोठ्या झाडाचा जंगल म्हणून या बीटाची ख्याती आहे. या वनरक्षक बीटात सागवान, बिजा, साजा, गरडी या सारखी इमारती लाकडे. आंबा, जांभूळ, मोह या सारखी फळ झाडे, आवळा, बेहळा, कवट, बेल या सारखी औषधी वनस्पती आहेत. मोठ्या झाडाचा व झुडपी जंगल असल्याने यात बिबट, अस्वल, लांडगा या सारखे हिंस्त्र श्वापदे. ससा, हरीण, सांबार, घोडेनील, रानडुक्कर यासारखे तृणभक्षी प्राणी तर साप, विंचू, घोरपड या सारखे सरपटणारे प्राणी व विविध प्रकारची फुलपाखरे ह्या वनरक्षक बीटाचे वैभव आहे.
वनरक्षक बीट रामपुरी च्या संरक्षणाची जबाबदारी वनरक्षक गोवर्धन सोनटक्के आणि काही रोजंदारी मजुरांवर आहे. वनरक्षकाच्या निवासस्थानाची व्यवस्थाही केली गेली असली तरी यात कोणताही वनरक्षक वास्तव्यास नसल्यामुळे दुरावस्था झाली असून वर्तमान वनरक्षक स्वगावावरून येणे-जाणे करीत असल्यामुळे वन संरक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याने वन तस्करांचे फावते व बहुमूल्य इमारती वृक्ष, फळझाडांची कत्तल व वाहतूक होत आहे. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून अवैध वृक्षतोड व वाहतूक थांबविणे आवश्यक झाले आहे.
*प्रतिक्रिया/स्टेटमेंट(चौकट)*
रामपुरी वनरक्षक बीटातील जंगल खुल्या जागेत आहे. तसेच अधिक गावे असल्यामुळे मनुष्यबळाअभावी एकट्याने जंगलाचे संरक्षण अशक्यप्राय बाब आहे. वनक्षेत्रालगत गावातील गावकरी अवैध वृक्षतोड करतात.
*गोवर्धन सोनटक्के, वनरक्षक रामपुरी*


0 टिप्पण्या