Ticker

6/recent/ticker-posts

पनवेलचा गावगुंड जगदीश गायकवाडावर तात्काळ कारवाई करण्याबाबत


दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885

 मुंबई :-जगदीश गायकवाड या गुंड व समाज विघातक प्रवृत्तीच्या व अनेक गुन्हेगारी केसेस असलेल्या व्यक्तीने अतिशय जहरी आणि नीच पातळीवर जाऊन आंबेडकर कुटुंबा बाबत गरळ ओकली आहे. हा आंबेडकर कुटुंबावरच नव्हे तर आंबेडकरी चळवळीच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचे कट कारस्थान दिसत आहे. या विषयावर समाजात तेढ निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न दिसत आहे. 

 जगदीश गायकवाड यांच्या अवैध धंद्यांबद्दल अगोदर अनेक तक्रारी आहेत. या सर्व गोष्टींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने ताबडतोब त्यांना ताब्यात घेऊन कारवाई सुरु  केली पाहिजे. जगदीश गायकवाड यांना अभय देण्याचे काम महाराष्ट्र सरकारने करू नये. लोकांच्या भावना प्रक्षुब्ध आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या