Ticker

6/recent/ticker-posts

कारुंडे येथे संविधान दिन ऊसतोड फडात साजरा.



दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885

सोलापूर - जिल्ह्यातील कारुंडे ता. माळशिरस येथे ऊस तोडणीच्या फडात भारतीय संविधान दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
यावेळी कारुंडे गावचे ग्रामसेवक मोरे, भावसाहेब, ऊस बागायतदार, अविनाश झंजे, अजित झंजे, हणमंत झंजे, युवराज साळुंखे, ऊसतोडणी कामगार मुकादम  नाना गायकवाड, मनिषा गायकवाड, अनिल गायकवाड,जयश्री गायकवाड, सोमनाथ गायकवाड, सुनिता गायकवाड, कांतीलाल नामदास, रेखा नामदास,महादेव बल्लाळ, सुरेखा बल्लाळ, भगवान खिलारे, पुष्पा खिलारे, दिलीप अवघडे, अलका अवघडे, सागर नामदास, विजया नामदास, जगु रूपनवर उपस्थित होते. 

           प्रथम संविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर नाना गायकवाड यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. उपस्थित मान्यवरांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अनिल गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले अशा प्रकारे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या