कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :-लाखनी तालुक्यातील गडेगाव येथील अशोक लेलँड कारखान्याच्या गेट समोरील राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ५ टिप्परांना राष्ट्रीय महामार्गाने जाणार्या ट्रकने मागेहून धडक दिल्याने उभे असलेले टिप्पर एकमेकाला आदळल्याने पाच टिप्पर व ट्रकचे नुकसान झाले तर क्लीनर किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान घडली. लाखनी कडून भंडारा कडे जाणार्या ट्रक क्र सीजी04/ एमडी 7596 चे चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व लापरवाहीने चालवुन रोडच्या बाजुला असलेले अशोक लेलॅण्डचे नविन टिप्परला मागेवुन धडक मारल्याने टिप्पर एकमेकाला आदळल्याने पाच टिप्पर व ट्रकचे नुकसान झाले क्लीनर किरकोळ जखमी झाला असुन त्याला ग्रामीण रूग्णालय लाखनी येथे उपचार करीता नेण्यात आले.घटनेची माहिती पोस्टे लाखनीचे एपीआय संजय कोरचे याना देन्यात आली. घटना स्थळावर सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद बघेले आपल्या चमुसह जावून वाहतूक सुरळीत केली.


0 टिप्पण्या